Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मातोश्रीवर धमकीचे फोन करणार अटकेत ; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मोठी कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई, दि.१२ : मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी (दि.६) धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन गेला होता. त्यावर दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांना एका अज्ञात नंबरहून धमकीचे फोन आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. इतंकच नाही तर खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले असल्याचं मह्टलं होतं. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्ष यंत्रणा करत होती.
शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका, रेडी रेकनर दरात अशी केली गडबड
ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावत त्यांना कोलकाताहून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर आरोपींची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबईवरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती पुढे आली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री 11च्या सुमारास 4 फोन काॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आॉपरेटरने घेतले होते.


Post a Comment

0 Comments