Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपने आता घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती व प्राथमिक तपासण्यासाठी पुढाकार घ्यावा : नानासाहेब जाधव

 



ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.५ - मनपा, भाजप व दीनदयाळ पतसंस्था या त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली आहे. यातून चांगले कार्य निश्चितच होईल. भाजपने आता घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती व प्राथमिक तपासण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले.
महापालिका, नगर शहर भाजप व पंडीत दिनदयाळ पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने नटराज कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी जाधव बोलत होते. यावेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, वसंत लोढा, ‘मबाक’च्या सभापती लता शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, सुनील रामदासी, नगरसेवक मनोज दुलम, रविंद्र बारस्कर, उदय कराळे, राहुल कांबळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, महेश तवले, तुषार पोटे, अमित गटणे, अजय चितळे, मनोज ताठे, मल्हार गंधे, शहर अभियंता सुरेश इथापे, कोविड सेंटरचे प्रमुख पी.डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात 100 बेडचे कोविड सेंटर आम्ही सुरू करत आहोत. यापूर्वीही मनपाने आनंद लॉन, पॉलिटेक्निक कॉलेज येथे कोविड सेंटर कार्यरत केले आहेत. बुथ हॉस्पिटलचा खर्चही मनपाच करत आहेत. नवीन कोविड सेंटरच्या माध्यमातून चांगली सेवा व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना काळात रुग्णांचे मनोबल खचणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
आयुक्त मायकलवार म्हणाले की, महापालिकेकडून कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही काम करत आहोत, प्रसिध्दी करणे आमचे काम नाही. नटराज कोविड सेंटरची कल्पना महापौरांचीच होती. सुरुवातीला या सेंटरसाठी आम्ही एमआयडीसीतील एका संस्थेशी संपर्क साधला होता. मात्र, महापौरांनीच पुढाकार घेत आम्हाला सर्व यंत्रणा उभी करुन दिली. क्रॉम्प्टन कंपनीच्या कर्मचार्‍यांनी 70 बेडस् आम्हाला उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच नटराजचे मालक मुनोत परिवार व रमेश कोठारी यांनी यासाठी मोठी जागा उपलब्ध करुन दिली, त्या बद्दल महापालिका त्यांचे आभारी आहे. नटराचे मालक स्व.शांतीलाल मुनोत यांच्या जयंतीदिनीच त्यांच्याच जागेत या सेंटरचे लोकार्पण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक भैय्या गंधे यांनी केले. सेंटरमधील जेवणाची जबाबदारी पंडीत दिनदयाळ पतसंस्थेने घेतली आहे. तर मेडिकल असोसिएशन मार्फत मोफत औषधे दिली जाणार आहेत. आयुर्वेद व्यासपीठातर्फेही मोफत आयुर्वेदिक उपचार होणार असून, हे सेंटर विनामूल सेवा देणार असल्याचे गंधे यांनी सांगितले.
वसंत लोढा म्हणाले की, मनपात भाजपचा महापौर असतांना मनपा काय करत आहे, असा विचार आम्ही करत होतो. मात्र, मागील काही दिवसांत मनपाच्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यावेळी आमचा गैरसमज दूर झाला. कुठलीही प्रसिध्दी न करता मोठे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. लाखो रुपये खर्च करुन नागरिकांसाठी सुविधा दिल्या जात आहेत. अत्यंत उत्कृष्ट काम मनपाकडून सुरू आहे. नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी ही कामे लोकांपर्यंत पोहचवावीत, असे ते म्हणाले.
राधाकृष्ण विखे, अभय आगरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. विवेक नाईक यांनी सूत्र संचालन केले.  

Post a Comment

0 Comments