ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी, दि.४ -बार्शी पुत्र भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्याकडील असलेले गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह अध्यक्षपद काढून घेऊन दिनांक ३ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय क्रमांक प्रआ यो २०१८/प्र.क्र.१३९/ ग्र नि धो २ नुसार मिरगणे यांना पदमुक्त करण्यात आलेले आहे.
राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण विकास महा मंडळावरील सह अध्यक्ष पदावर करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याने त्यांना दिलेल्या मंत्रिपदाच्या दर्जाही यान्वये संपुष्टात येत आहे त्यामुळे वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक१०.१०/प्र.क.९६/१०/सा.ऊ. दि. १३/३/ २०१२ अन्वये अनुज्ञेय केलेल्या सेवा-सुविधा यापुढे त्यांना अनुज्ञेय राहणार नाहीत.
राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात मिरगणे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ च्या सह अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती व अध्यक्ष पद हे मुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आले होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या मंडळा वरील सर्व पदाच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत सातत्याने विचार सुरू होता शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला व त्यानुसार शासन आदेश काढून राजेंद्र मिरगणे यांचे पद काढून घेतले आहे. हा आदेश राज्यपालांच्या सल्ल्यानुसार उपसचिव रामचंद्र धनवडे यांनी काढला आहे.
0 Comments