Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारुच्या जाचाला ञस्त होऊन बायकोने केली नव-याची हत्या

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील बायकोने नव-याच्या नेहमीच्या दारुच्या जाचाला ञस्त होऊन नव-याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समुद्रपुर तालुक्यातील वायगाव (गोंड) या ठिकाणी घडली. मयताचे नाव मुर्लिधर नथ्थू पिचकाटे (वय ५२) असे आहे. तर आरोपी बायकोचे नाव नंदा मुर्लिधर पिचकाटे असे आहे.
मुर्लिधर हा नेहमीच दारू पिऊन घरी आल्यानंतर कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याने पत्नी नंदा पिचकाटे हीत्याच्या जाचाला कंटाळली होती. सोमवारी रात्री मुर्लिधरने दारू पिऊन नंदाला मारहाण केली. 
पतीच्या मारहाणीचा नंदाला राग अनावर झाला आणि तिने जवळच असलेल्या काठीने मुर्लिधर वर काठीने वार केले. यावेळी तो मुर्लिधर पलंगावर पडला असता नंदाने पुन्हा काठीने वार केल्याने मुर्लिधर यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मुर्लिधर याचा भाचा स्वप्नील घोडे याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच समुद्रपुर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, समुद्रपुरचे ठाणेदार हेमंत चांदेवार, पो.उ.नि. दिपेश ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.  आरोपी बायको नंदा पिचकाटे हिला अटक केली. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments