Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रक्तपेशींप्रमाणेच पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा महत्त्वाच्या !

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
रक्तपेशींप्रमाणेच पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतात. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून संक्रामक रोगांपासून आपला बचाव करण्याचं महत्त्वाचं काम या पांढऱ्या रक्तपेशी करतात.
या लेखात जाणून घेऊया पांढर्‍या पेशी वाढवण्याचे काही घरगुती उपाय.
आपण आजारी पडतो, कधी आपल्यातील प्रतिकारशक्ती खूप कमी होते. त्यावेळी डॉक्टर सांगतात की तुमच्या शरीरातील पांढर्‍या पेशी कमी झाल्या आहेत. मुळात चांगल्या आरोग्यासाठी पांढऱ्या पेशी संतुलित प्रमाणात असणं महत्त्वाचं असतं. मग आपण औषधे घेतो.
काहीवेळा या पेशी काही नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करून, म्हणजे आहारात काही बदल करून वाढवता येतात. मुळात यासाठी योग्य तो आहार घेतला किंवा आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केला तर पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी औषधांचं मारा करण्याची वेळच येणार नाही.
डेंगू, मलेरिया आदि आजारात या पेशी कमी होतात. जाणून घेऊयात या पांढर्‍या पेशी म्हणजे काय? त्यांचे आपल्या शरीरातील महत्व.

पांढर्‍या पेशी म्हणजे काय? त्यांचे शरीरातील काम काय?
पांढर्‍या रक्तपेशी रक्तातच असतात. त्यांना वैद्यकीय परिभाषेत ‘ल्युकोसाईट’ म्हणतात.
या पाच प्रकारच्या असतात. या पेशी आपल्या हाडांमध्ये तयार होतात. शरीरातील विषाणू आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी या पेशी काम करतात.
या पेशींच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ति कमी होते. त्यासाठी शरीरात या पेशी कमी असल्या तर काही संक्रमित आजार होण्याचा संभव असतो.
विषाणूंशी सामना करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शरीरातील पांढर्‍या पेशींची संख्या योग्य प्रमाणात असली पाहिजे पाहिजे. निरोगी आणि प्रतिकारशक्ती चांगली असणार्‍या माणसाच्या शरीरात याचे प्रमाण 4000 ते 11,000 मायक्रोलिटर एवढी असते.
त्यामुळे या पांढर्‍या पेशी कशा वाढवल्या पाहिजे, यासाठी काही उपाय आज आपण पाहुया.
 विटामीन ई– विटामीन ‘ई’ च्या कमतरतेमुुळे शरीरातील पांढऱ्या पेेेशी कमी होतात. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये आहारात आहारात वापरावीत. विटामीन ‘ई’ च्या सेवनामुळे हृदयरोग, कॅन्सर आदि आजार होण्याची शक्यता 50% कमी होते.
वैद्यकीय सल्ल्यानुसार आहारात रोज 60% विटामीन ‘ई’ घेतले गेले पाहिजे. जर तुम्ही मद्यपान, तंबाखू, सिगरेट अशा व्यसनाच्या शौकीन असाल तर मात्र ही मात्रा वाढवली पाहिजे. मुळात व्यसनांपासून दूर राहणे हेच कधीही हितावह.
 विटामीन सी – ‘विटामीन सी’ हे आपल्या शरीरातील पांढर्‍या पेशींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीरातील प्रतिकारशक्ती परिणामकारकरीत्या वाढते. आणि म्हणूनच कोणत्याही आजारी व्यक्तिला लिंबू-पाणी, संत्री रस प्यायला संगितले जाते.
‘विटामीन-सी’ फळांच्या रसामधून मिळते. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारात विटामीन ‘सी’ हा घटक खूप प्रभावी ठरत आहे. याच्या गोळ्याही दिल्या जातात. पण, याचे अधिक सेवन चांगले नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या दिल्या जातात. मानवी शरीरासाठी रोज 200 ग्रॅम विटामीन सी पुरेसे आहे.
 लसूण – हा तुमच्या स्वयंपाक घरातील औषधी घटक आहे. सर्दी आणि वातावरणातील बदलामुळे होणार्‍या आजारांना कमी करण्यासाठी लसणाचा वापर होतो. रक्तातील दोष दूर करण्यासाठी याचा वापर होतो. रक्त पातळ करण्यात याचा उपयोग होतो.
 ब्रोकोली -‘ब्रोकोली’ ही भाजी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पांढर्‍यासाठी पेशींसाठी उपयुक्त आहे. यामध्ये विटामीन ‘सी’ आणि विटामीन ‘ए’ असते. त्यामुळे याचा वापर आहारात केला जावा. तसेच ही भाजी जास्त न शिजवल्यास तिच्यातील पोषकतत्व टिकून राहते. तसेच याची कोशिंबीर किंवा सॅलड करून खाऊ शकता. ब्रोकोली भाजी प्रतिकारशक्ती वाढवते.
लाल शिमला मिरची (ढोबळी मिरची)- दिसायला अगदी लाल असली तरी हिच्यात असणारे अँटिऑक्सिडण्ट्स पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी महत्त्वाचे असतात. विटामीन ‘सी’ आणि बिटा-केरोटीनने भरपूर असणारी ही लाल शिमला मिरची आहारात वापरली पाहिजे.
याची भाजी करून तुम्ही खाऊ शकता किंवा ग्रेव्हीमध्येही वापर करू शकता.
 पालक – पालकाची हिरवीगार भाजी तर पौष्टिकतेने भरपूर आहे. यामध्ये विटामीन ‘सी’, बिटाकेरोटीन, अँटिऑक्सिडण्ट्स प्रमाण खूप असल्याने डॉक्टर पालकच्या सेवनाचा सल्लाही देतात. पालकाचे सूप प्यायल्याने आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
प्रतिकारशक्ती वाढते, पांढर्‍या पेशींची वाढ होते. पालक जास्त शिजवल्याने त्यातील पौष्टिकता कमी होते.
 दही- प्रभावी अँटिऑक्सिडन्ट म्हणून प्राचीन काळापासून दह्याचा वापर केला जात आहे. दह्यामध्ये विटामीन ‘सी’, कॅल्शियम, विटामीन ‘डी’ भरपूर प्रमाणात असते. रोज ताज्या दुधाच्या दह्याचा वापर आहारात केल्याने तुमची कार्यक्षमता टिकून राहते. तुम्ही फ्रेश राहता आणि बाहेरील संक्रमणापासून स्वतःचा बचाव करू शकता.
ग्रीन टी आणि बदाम -‘ग्रीन टी’ आणि ‘बदाम’ यांचे सेवन रोज केल्याने तुमच्यातील प्रतिकारशक्ती वाढते. ग्रीन टी तुम्हाला फ्रेश ठेवते. हृदयरोग आणि कॅन्सर सारख्या आजारांनाही दूर ठेवते. बदामाच्या रोजच्या सेवनाने तुम्हाला प्रोटीन आणि फायबर मिळतात. तसेच तुमच्या शरीराला पुष्टता प्राप्त होते. तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठीही बदाम महत्वाचा आहे.

पांढर्‍या पेशी वाढवण्यासाठी वरील आहारातल्या पदार्थांचा तुम्ही वापर करू शकता. याच्यासोबतच तुम्ही काही आणखीही उपाय करू शकता. याप्रमाणे…
भुजंगासन– नियमित योगासने केल्याने तुम्ही आजारांपासून दूर राहता. भुजंगासनाने आसनाने तुमच्या गळ्यातिल ‘थाईम ग्रंथी’ सक्रिय होतात. तसेच तुमच्यातील प्रतिकारशक्ती वाढते. या ग्रंथी आपल्याला आरोग्य अनेक संक्रमणांपासून दूर ठेवतात. दोन्ही हात जमिनीवर टेकवून, पाय मागे करून गळ्याचा भाग नागाच्या फण्यासारखा वर करून हे आसन करतात.
भरपूर पाणी पिणे– आपल्या शरीरातील प्राणवायूचे अर्थात ऑक्सीजनचे प्रमाण योग्य राहण्यासाठी भरपूर आणि शुद्ध पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. आपल्या शरीरात साधारणपणे रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी जाणे आवश्यक आहे.
त्यासाठी तुम्ही लिंबूपाणी, ग्लुकोजचे पाणी, नारळ पाणी सुद्धा पिऊ शकता.
व्यसनांपासून दूर राहणे – तुम्ही जर मद्यपान, सिगरेट अशी व्यसने केल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. इतर आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच आपल्या शरीराला कमीत कमी ७ ते ८ तास शांत झोपेची आवश्यकता असते.
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यावे – पांढऱ्या रक्तपेशी कमी होण्याचे एक कारण हे कॉपर डिफिशिअन्सी सुद्धा असू शकते. म्हणून तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे हे आयुर्वेदात सुद्धा हितकारी मानले गेलेले आहे. याशिवाय कॉपर चा समावेश असलेला आहार म्हणजेच सीफूड, ड्रायफ्रूट्स यांचा समावेश सुद्धा आहारात करावा.
आपण आपल्या शरीरासाठी हे सगळे कराच पण त्यासोबतच तुमची रोजची दिनचर्या आरोग्यपूर्ण ठेवा.
योगासन, व्यायाम, आहार चांगला असेल तरच तुमची प्रतिकारशक्ती अबाधित राहणार आहे. तुम्ही निरोगी राहाल. वर सांगितलेल्या नियमांचा आणि आहाराचा उपयोग करून प्रतिकारशक्ती वाढवा आणि विषाणूच्या संक्रमणाला दूर ठेवा.

Post a Comment

0 Comments