Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मळणी यंञाद्वारे बाजरी काढताना यंञात हात जाऊन महिलेचा मृत्यू

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राहुरी : राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण या ठिकाणी मळणी यंञाद्वारे बाजरी काढत असताना यंञात हात जाऊन महिलेचा दुर्दैवी घटना घडली. विजया वैभव काकडे (वय २४) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विजया काकडे या शेतातील काढण्यात आलेली बाजरी ही मळणी यंत्राद्वारे काढत असताना चाळणीत साचलेले कांड्या काढण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला बांधलेले फडक मळणी यंत्राच्या शाफ्टमध्ये अडकले. शाफ्टला गती असल्याने फडके गुंडाळून त्यामध्ये अडकली गेली. वेगवान गतीने ती महिला जमिनीवर जोरदार आदळली गेली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हाता पायाला मार लागला. तिला तातडीने उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर रात्री उपचार सुरु होते. मात्र तिचा रक्तस्त्राव अधिक झाल्याने तिने उपचाराला साथ दिली नाही. अखेर रात्री ती मयत झाली. मयत महिलेस ३ वर्षाची व ११ महिन्याची मुली आहे.  

Post a Comment

0 Comments