ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर,दि.११ : दोन दिवसांपूर्वी तालुक्यात पूर्व भागात अतिवृष्टीने पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.याबाबत नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्याकडे निवेदन दिले.
यावेळी बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे, अक्रम आतार,देवा पवार, विनोद ढाकणे उपस्थित होते. ढाकणे म्हणाल्या, या हंगामामध्ये पावसाने शेतकर्यांना चांगली साथ दिली. मात्र शेवटच्या टप्प्यात वादळी पावसाने स्वप्नांचा चुराडा केला. शासनाच्या मदतीशिवाय शेतकरी उभा राहू शकत नाही.
0 Comments