Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...अन् नंतरही खाकीत मी देव पाहिलाऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पोलीस म्हटले की अनेकांना धडकी भरते. नको त्या झंझटीत पडायला असे म्हणून लोक नाक मुरडत खाकीपासून चार हात लांब राहतात. लॉकडाऊन काळात अन् नंतरही खाकीत मी देव पाहिला, अनुभवलाय. संदीप मिटके असे त्या देवदूताचे नाव. अनेक गरजवंतांना त्यांनी मदत केली. केलेली मदत या हाताची त्या हातालाही कळू दिली नाही. त्यांची वर्तणूक मी माझ्या डोळ्यांनी पाहिलीय, कानांनी अनुभवली. अशा देवदूताबद्दल लिहण्यासाठी पेन उचलला अन् मनात आलं ती लिहलयं...
नगर सिटीचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्याबद्दल अनेकांकडून ऐकलं होता. पण त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवच आला, त्यानंतर मला त्या मिटकेसाहेब खरोखरच देवदूत असल्याचं मनोमनं जाणवलं. नगर शहरात कोरोनाची भयावह परिस्थिती आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. खाकी वर्दीतील एका उच्च अधिकार्‍याच्या तोंडातून समाजाला धीर देण्याचे शब्द जर ऐकले तर नक्कीच कुठे तरी आजही माणुसकी असल्याचे जाणीव होते.
बुधवारी नगर शहरात आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते संपत नलावडे यांचे बंधू डॉ. सुमीत नलावडे यांनी पाच-सहा डॉक्टरांची मोट बांधत कोवीड केअर सेंटर सुरू केले. आमदार, माजी आमदार, सांप्रदायिक क्षेत्रातील महाराजांना त्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमासाठी एसपी अखिलेशकुमार सिंह, एएसपी सागर पाटील, डीवायएसपी संदीप मिटके हेही उपस्थित होते. मित्राने सेवाभावी वृत्तीने सुरू केलेल्या कोवीड केअर सेंटरच्या उद्घाटनाला आमची उपस्थिती होतीच. कोणाच्या बोलविण्याची वाट न पाहता मी सर्वात अगोदर तेथे पोहचले. उद्घाटनवेळेपूर्वी बराच वेळ अगोदर नेवाशाचे महंत ..... यांचे आगमन झाले. प्रशासनातील मोठे अधिकारी निघालेत, ते वेळेत पोहचतील असे डॉक्टरांकडून समजले. काही वेळेतच खाकीतील ‘साहेब’ लोक आले. नेहमीप्रमाणे राजकीय मंडळी उशिराने आली. वेळेचे बांधिल असलेले खाकीतील साहेबांनी एन्ट्रीच्या दरवाजाची फित कापून उद्घाटन केले. कोवीड सेंटरची सुविधा पाहिली अन् गप्पा मारत ते मार्गस्थ झाले.
त्यानंतर प्रकटलेल्या राजकीय मंडळींच्या हस्ते कोवीड सेंटरमधील आयसयू कक्षाची फित कापून उद्घाटनाचा सोपस्कर पूर्ण झाला. त्यानंतर काहींनी न्यूज चॅनलवाल्यांना मुलाखती दिल्या, जाताना डॉक्टर नलावडे त्यांच्या स्टाफला शुभेच्छा दिल्या. जाताना दिलेल्या शुभेच्छातील एका खाकी अधिकार्‍यांच्या शुभेच्छाचे बोल मला खूपच भावले. ते अधिकारी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर ते होते संदीप मिटके.
डॉ. सुमीत नलावडे यांच्याशी मिटके यांचा झालेला संवाद असा,‘ डॉक्टरसाहेब बरे झाले आपण 30 बेडचे व्हेंटिलेटर असलेले कोविड सेंटर सुरु केले. उद्घाटन झाले आता मी तुम्हाला काय शुभेच्छा देऊ?, ‘मला कधी आनंद होईल, जेव्हा हे सर्व कोविड सेंटर बंद होतील व भयानक महामारीचा कोरोना आजार समूळ नष्ट होईल’. डॉक्टरांना वाईट वाटणार याची खात्री पटल्याने पुन्हा डॉक्टरांना ‘वाईट वाटून नका घेऊ, आलेल्या पेशंटची काळजी घ्या आम्ही निघतो, असे म्हणत धौर्यही दिले. एका कोपर्‍यात उभा राहून या दोघांमधील संवाद मी ऐकलाय. एका पोलीस अधिकार्‍याचे आतील देव जागा झाल्याचे त्यावेळी मी प्रत्यक्षात अनुभवलं. त्यामुळेच त्या देवदूताबद्दल लिहण्यासाठी हात पुढे झाला.
सध्याच्या भयावह परिस्थिती मध्ये इतके वाईट ऐकायला व वाचायला भेटतंय की विचारता सोय नाही. दोष तरी कोणाला दयावा, महापालिकेच्या अधिकार्‍यांना की डॉक्टरांना. सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे दिवसातून मदतीची मागणी करणारे एक किंवा दोन फोन नक्कीच येतात. साहेब व्हेंटिलेटर असलेले कोविड सेंटर सुचवा, पेशंटला फार त्रास होतोय, अशी विनवणी केली जाते. अश्या वेळी समोरच्याला काय बोलाव सुचत नाही, परंतू त्याला मदत करणे आलेच. सिव्हिलला किंवा इतर हॉस्पिटलला फोनकॉल करून कुठे तरी त्यांना जागा मिळवून द्यायची. असा दिनक्रम सुरू असतो. काही दिवसांनी परत त्याच पेशंटच्या नातेवाईकाचा फोन येतो. फोनवर ‘साहेब पेशंट गेलं किंवा साहेब डॉक्टरांनी फार बिल केले, असे बोल हमखास ऐकू येणार. पुन्हा अश्या परिस्थितीमध्येही डॉक्टरांना सांगून बिल कमी करावयाचे. डॉक्टरांना विनवणी केली की तेही बिल कमी करून देतात.
कोरोनाच्या भयाण परिस्थितीत काही अधिकारी व काही डॉक्टर टाळ्यावरची लोणी खातायत तर काही अधिकारी व डॉक्टर अत्यंत कर्तव्यदक्षपणे आपल्या जीवाची परवा न करता काम करत असल्याचे मी अनुभवले. परंतु अशा या भयावह परिस्थितीमध्ये माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे जाणवते, तीही खाकी वर्दीत. मिटके साहेबांनी आंतकरणापासून बोललेल्या त्या शब्दांचे कौतुक वाटले. माणसातील देव पाहिल्याचे प्रचिती त्यावेळी आली. मिटके साहेबांच्या कार्याला मनापासून सलाम अन् त्याच्या पुढील कार्याला हार्दिक शुभेच्छा...!

संकलन - श्रीनिवास बोज्जा
सामाजिक कार्यकर्ते 9890812000

Post a Comment

0 Comments