Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'आसाराम' ची वास्तव घडामोडी पहाता, या महा महाढोंग्याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे ; जनमाणसातून प्रतिक्रिया
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

२०१२ साली छिंदवाडा येथील आश्रमात आसारामचा सत्संग होतं. त्यावेळी आसारामची नजर ११ वी मध्ये असणाऱ्या एका मुलीवर गेली. आसारामने त्या मुलीला बोलवून घेतलं तिची चौकशी केली. आसाराम सारखा माणूस आपणाला बोलावून घेतो आणि चौकशी करतो म्हणल्यानंतर मुलगी खूष झाली. 
आत्ता आसाराम काय करतो तर हरिद्वारला असणाऱ्या शिल्पी नावाच्या वार्डनला छिंदवाडा इथे पाठवतो आणि त्या मुलीला आपल्याजवळ पाठवून द्यायची जबाबदारी तिच्याकडे देतो. 
🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜

शिल्पी नावाची वार्डन त्या मुलीच्या संपर्कात येते. ती आसाराम बापूकडे जाण्याची गळ तिला घालते पण मुलगी काही केल्या तयार होत नाही. तेव्हा शिल्पी थेट त्या मुलीच्या आईवडीलांना फोन करते आणि सांगते की तुमच्या मुलीवर भूतबाधा झाली आहे. स्वत: आसाराम बापू तिच्यावर उपचार करणार आहेत. त्या मुलीची आई आसाराम भक्त असल्याने लगेच तयार होते पण वडील तयार होत नाहीत. 
त्यानंतर शिल्पी त्या मुलीच्या आईवडिलांना सांगते की महाराज जोधपूर जवळच्या त्यांच्या कुटीत येणार आहेत. तिथेच मुलीवर उपचार होतील. तूम्ही देखील या. आईवडिलांच्या समोर हे उपचार होणार असल्याने वडील तयार होतात. 
दूसरीकडे आसाराम जोधपूरला फोन करून शिवा नावाच्या व्यक्तीला जोधपूरमध्ये ९, १० आणि ११ ऑगस्ट रोजी सत्संग ठेवण्याचं सुचवतो.
ठरल्याप्रमाणे ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान सत्संग होतो.  त्यानंतर विश्रांतीसाठी आसाराम जोधपूर पासून जवळ असणाऱ्या आपल्या एकांतकुटी नामक आश्रमात जातो. इकडेच त्या मुलीच्या आईवडिलांना व संबधित मुलीला बोलवण्यात येतं. 
१३ ऑगस्ट रोजी शहाजहांपूरवरून ती मुलगी तिचे आईवडिल एकांतकुटीत पोहचतात. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी आसाराम त्यांना भेटत नाहीत पण १५ ऑगस्टच्या सकाळीच त्यांना निरोप पाठवला जातो की आज आसाराम तुमच्या मुलीवर उपचार करणार आहेत. 
त्यानंतर एका खोलीत आसाराम पुढे संबधित मुलगी तिचे आई वडील आणि एखादा दूसरा सहकारी असतो. आसाराम पूजेचं साहित्य मांडतो. काहीकाळ बडबडल्यासारखं करुन तिच्या आईवडिलांना बाहेर जावून पूजा करण्यास सांगतो. याचं कारण विचारल्यानंतर आई वडिलांना सांगण्यात येत की भूत कोणत्याही व्यक्तीवर आक्रमण करू शकतं. बाबा आणि संबधित मुलगीच इथे थांबतील तूम्ही बाहेर जावून पूजापाठ करा. 
आईवडिल आणि उपस्थित असणारे कार्यकर्ते बाहेर जातात आणि आसाराम त्या मुलीवर बलात्कार करतो. ही घटना घडली तेव्हा मुलीचं वय फक्त १६ वर्ष होतं. चार्जशिटमध्ये सर्व गोष्टी अगदी डिटेल्स दिल्या आहेत. मुलीसोबत आसारामने मुखमैथून केलं. त्यानंतर आसाराम त्या मुलीला धमकी देतो, ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्यासह तुझ्या आईवडिलांना मारून टाकण्यात येईल.
मुलगी आईवडीलांसह शहाजहांपूरला आपल्या घरी येते. १६, १७ तारीख जाते आणि १८ ऑगस्ट दिवशी मुलगी धाडस करून आपल्या आईला सर्व घटनाक्रम सांगून टाकते. या गोष्टीनंतर तिची वडील आसराम कुठे आहे त्याची चौकशी करतात. तेव्हा त्यांना समजत की १८,१९,२० तारखेला आसाराम दिल्लीच्या रामलीला मैदानात सत्संग आयोजित करत आहे. 
झालेल्या प्रकाराचा जाब आसारामला विचारायचा आणि केस करायची या उद्देशाने मुलीचे आईवडील आणि मुलगी शहाजहापूरवरून दिल्लीत पोहचतात. १९-२० तारखेला ते रामलीला मैदानात जातात पण आसारामच्या आजूबाजूची लोकं तिच्या वडीलांना आसाराम बरोबर बेट घालून देत नाहीत. 
२० तारखेला सत्संग संपत येवू लागतं तेव्हा त्या मुलीचे आईवडील व मुलगी थेट रामलीला मैदानाजवळ असणारं कमला मार्केट पोलीस स्टेशन गाठतात. तिथे मुलगी पोलीसांना घडलेला प्रकार सांगते. आसारामचं नाव ऐकताच पोलीस अधिकारी ही घटना आपल्या वरिष्ठांना कळवतात. सुरवातीला जोधपूरची घटना असल्याने ही एफआयआर जोधपूरलाच दाखल करता येईल अस पोलीस सांगतात पण वरिष्ठांना आसाराम असल्याने हे प्रकरण दाबलं जाईल याची शंका येते.
वरिष्ठ पून्हा झिरो एफआयआर दाखल करण्यास सांगतात. झिरो एफआयआर नुसार घटना कुठेही घडली असो व्यक्ती आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करु शकतो. पुढच्या तपासासाठी ही एफआयआर पोलीस ट्रान्सफर करत असतात. कमला मार्केटमध्ये एफआयआर दाखल करुन ती जोधपूर पोलीसांकडे देण्याचा निर्णय घेण्यात येतो. एफआयआर दाखल झाल्यानंतर मिडीयात बातमी फुटते आणि आसाराम गायब होतो. दरम्यानच्या काळात जोधपूर पोलीस एकांतकुटीवर धाड टाकतात. पुरावे गोळा करतात आणि आसारामला ३१ ऑगस्ट अखेर शरण येण्याचं फर्मान सोडतात. 
३१ ऑगस्ट रोजीचं पोलीसांना टिप मिळते की आसाराम त्याच्या इंदौरच्या आश्रमात लपून बसला आहे. आसारामला अटक केली झाले आणि पॉस्को अंतर्गत कारवाई केली जाते. त्यानंतर आसारामचा पोरगा नारायणसाईचा फास आवळण्यात आला. एकामागून एक घटना समोर येऊ लागल्या. एकूण साक्षिदारांपैकी ९ जणांवर हल्ले करण्यात आले त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला. घटनेची चौकशी करणारे अजय पाल लांबा या पोलीस अधिकाऱ्यांना एकूण १६०० धमक्यांची पत्रे मिळाली. राम जेठमलानी आणि सुब्रम्हण्यम स्वामी यांच्यासारखे वकिल आसारामने दिले पण काहीच फायदा झाला नाही. २०१८ साली जेव्हा केसचा निकाल लागला तेव्हा न्यायाधीश म्हणाले आसाराम सारख्या माणसाने कधीही जेलमधून बाहेर पडता कामा नये. आसाराम सारखा माणूस जिथं जाणं गरजेचं होतं तिथेच जाऊन अखेर सडत राहिला.

Post a Comment

0 Comments