Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जुगार अड्डयावर छापा ; ४१ जण ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राहाता, दि.१३ - तालुक्यातील कोल्हार बु॥ येथे कोल्हार - लोणी रस्त्यानजिक असणा-या इमारतीच्या टेरेसवर तिरट नावाचा हारजितीचा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात ४१ जुगा-यांना ताब्यात घेऊन ४४ लाख १७ हजार ७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई केली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१३ सप्टेंबरला रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना गोपनीय माहीती मिळाली कि, कोल्हार बुद्रूक (ता.राहाता) येथे कोल्हार-लोणी जाणा-या रस्त्याच्या कडेला मुदस्सर शकील शेख (रा . कोल्हार बुद्रूक , ता- राहाता) हा कय्युम करीम शेख याच्या इमारतीचे टेरेसवर २५ ते ३० लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवीत आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाली. या माहितीच्या आधारे
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिल्याने नमुद अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई गणेश इंगळे , पोहेकॉ विष्णू घोडेचोर, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, पोना शंकर चौधरी, विश्वास बेरड, विजय ठोंबरे, विशाल दळवी , पोकॉ राहूल सोळंके, संदीप दरंदले , मच्छिन्द्र बर्डे, सागर सुलाने, योगेश सातपूते, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर , देविदास काळे ही सर्व मिळून शासकीय वाहनाने कोल्हार पोलीस दूरक्षेत्र येथे गेले. जुगाराच्या ठिकाणी वाहने उभी करुन मिळालेल्या बातमीचे ठिकाणी दोन पंचासह पायी जावून खात्री केली. कय्यूम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर ३५ ते ४० इसम पाच वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन तिरट जुगार खेळत असताना दिसले. त्यावेळी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची खात्री झाल्याने रविवारी रात्री ८ वा. च्या सुमारास छापा टाकला. जुगार खेळत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कर्मचारी व पंचाची ओळख सांगितले. छाप्यात पकडलेल्यांना त्यांची नावे , पत्ते विचारले असता नावे , पत्ते याप्रमाणे
चेतन विजय वाघमारे (वय २३ , रा . पिंपळस , ता.राहाता ), मुदस्सर शकील शेख (वय ४१ , रा . कोल्हार बुा , ता- राहाता), अश्पाक जमील शेख ( वय ४३, रा. मनमाड, ता नांदगांव , जि.नाशिक), सागर वसंत बेदाडे , वय -३२ वर्षे , रा . मनमाड , ता नांदगांव, दिलावर मन्सूर शेख (वय२१ , रा . कोल्हार बुाा, ता. राहाता ), अरबाज राजू पठाण ( वय १९, रा . राहाता , ता. राहाता) , माहीद कय्यूम शेख ( वय१९ , रा. कोल्हार बुा , ता.राहाता), जुबेरखान निसारखान पठाण ( वय३७ , नाईकवाडपुरा , संगमनेर), असीफ तसलिम शेख (वय ३५ , रा . कोल्हार बुा , ता- राहाता) , अर्शद रशिद मोमीन ( वय २५, रा . येवला, जि.नाशिक) , वंसत लक्ष्मण वडे (वय ६० , रा . येवला , जि नाशिक), अमित हरिभाऊ गाडेकर ( वय ३२ , रा . राहाता) , लालू मारुती चौधरी , वय३५ , रा . अकोले , जि.अ.नगर), कय्युम गुलाब पठाण ( वय ४७, रा . विसापूर , ता श्रीगोंदा) , नवाब हुसेन शेख ( वय ४९ , रा. लोणी , ता. राहाता) , जाहीद दिलावर सय्यद (वय १९ , रा . अंबीकानगर , कोल्हार बुाा , ता. राहाता) , सय्यद अली मोहमंद ( वय ६० , रा . वांबोरी , ता- राहुरी) , सतिष हणूमंत वैष्णव ( वय ४१ , रा . अकोले , जि. अ.नगर ), रविंद्र सुभाष चकोर (वय३३, रा . माधवनगर , मनमाड , जि. नाशिक) , मुनावर सलीम शेख ( वय ३० , रा . वांबोरी , ता.राहुरी) , दिपक रामदास उंबरे (वय४२ , रा . येवला , जि. नाशिक), परवेज शेख अब्दुल रेहमान ( वय ३८ , रा . मनमाड , ता- नांदगांव , जि- नाशिक) , अब्बास राजू शेख ( वय २१, रा मनमाड , ता- नांदगाव , जि- नाशिक), चाँद इब्राहीम शेख (वय २९ , रा . कोल्हार बुाा , ता. राहाता), जयहींद गोविंद माळी , वय ४७ , रा . राहुरी बुा , ता. राहुरी), विलास दत्तात्रय चोथे ( वय ४३ , रा . वांबोरी , ता.राहुरी, सागर मदनलाल वर्मा , वय ३८ , रा . बेलापूर बा, ता. श्रीरामपूर), गणेश विठ्ठल जेजूरकर ( वय ३४ , रा . शिर्डी , ता. राहाता) , इम्रान याकूब मोमीन , वय ३६ , रा . मनमाड , ता- नांदगांव , जि. नाशिक) , शकील सलीम शेख (वय२९, रा . अंबीकानगर , कोल्हार बुाा , ता. राहाता) , नजीर अजीज शेख ( वय ४२ वर्षे , रा . राहुरी बुाा , ता. राहाता), संतोष बाबूराव चौधरी ( वय. ४० , रा . अकोले , जि.अ.नगर ) , शकील जब्बार शेख (वय ६२ , रा . कोल्हार बुा , ता. राहाता), संजय कांतीलाल पटेल (वय ३५, कोल्हार , ता. राहाता ), नुमान सत्तार शेख (वय २० , रा . कोल्हार बुगा , ता.राहाता) , संकलेन कय्यूम शेख (वय २४ , रा . कोल्हार बुाा , ता- राहाता ) , भाऊसाहेब रामराव चौधरी ( वय ३२ , रा . रुई , ता. राहाता ), सचिन बाळाराम पवार ( वय ४० , रा . कोल्हार बुा , ता. राहाता) , अमोल भास्करराव वाघमारे , (वय ३७ , रा . विसापूर , ता.श्रीगोंदा) , गणेश रंगनाथ सोमासे (वय २९ , रा . येवला, जि. नाशिक), महेश आण्णा बुरकूल ( वय ३१ वर्षे , रा . मनमाड , ता. नांदगाव , जि - नाशिक) असे सांगितले. या सर्वांची पंचासमक्ष अंगझडती घेतली. अंगझडतीमध्ये व कब्जामध्ये ८ लाख १९ हजार १४० रु . आठ लाख रोख रक्कम व २ ६६,६५० रु . किं. चे वेगवेगळ्या कंपन्यांचे ३२ मोबाईल , ३३ लाख रु . किं.ची ७ चारचाकी वाहने व ३२ हजार रु . किं . च्या दोन मोटार सायकली व तिरट जुगाराची साधने असा एकूण ४४ लाख १७ हजार ७९० रु. किं.चा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करुन वरील नमुद ४१ आरोपी विरुध्द पोना शंकर संपतराव चौधरी (स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन लोणी पो . स्टे . येथे गुरनं . ॥ ७४९ / २०२० , महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लोणी पो . स्टे . करीत आहेत . 

Post a Comment

0 Comments