Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जेवणात गर्भपाताच्या गोळ्या घालून महिलेचा गर्भपात

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जुन्नर:- महिलेच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या टाकून जेवण देऊन गर्भपात केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, शेखर रामदास वाघुले (वय ३०, रा. रहाटणी. मूळ रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर), सासरे, रामदास वाघुले, सासू, आशा वाघुले (दोघे रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन माहेरहून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली. कौटुंबिक कारणांवरून मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादी विवाहिता गरोदर असताना आरोपी पती शेखर याने विवाहितेच्या नकळत तिच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या मिक्स केल्या. त्याद्वारे तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments