Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मंगळवारी ६८१ रुग्ण बरे होऊन परतले घरी ; नव्या ७४४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१५ : जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७४४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७२२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८ आणि अँटीजेन चाचणीत ४६७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७६, संगमनेर १८, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर ०९, नेवासा ३९, राहुरी ०१, शेवगाव ४९, कोपरगाव ०८, जामखेड ०३, कर्जत ०१,मिलिटरी हॉस्पिटल १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ०७, संगमनेर ०३, राहाता १४, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपुर ०२, कॅंटोन्मेंट ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०५, अकोले ०१, राहुरी ०१, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ४६७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ५०, संगमनेर ४७ राहाता ३८, पाथर्डी ३२, नगर ग्रामीण १४, श्रीरामपूर ३५, कॅंटोन्मेंट ०६, नेवासा १४, श्रीगोंदा १६, पारनेर ३९, अकोले २६, राहुरी १५, शेवगाव ४१, कोपरगाव २५, जामखेड ४३ आणि कर्जत २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ६८१ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.मनपा १३३, संगमनेर ६१, राहाता ५२, पाथर्डी २६, नगर ग्रा ४०, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट २२, नेवासा ६८, श्रीगोंदा १९,
पारनेर ४०, अकोले ३१, राहुरी २६, शेवगाव ३४, कोपरगाव २०, जामखेड ३३, कर्जत २७, मिलिटरी हॉस्पिटल १७, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २७६७२,
उपचार सुरू असलेले रूग्ण:४७२२
मृत्यू:५१३

Post a Comment

0 Comments