ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
चव किंवा वास न कळणे हे कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षण आहे, हे आता आपल्याला माहीत आहे. साधारणपणे, इतर सर्दी किंवा फ्लूमध्येही आपल्याला चव आणि गंध कळत नाही.
पण युरोपमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात एक विचित्र माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशी शंका आल्यावर रुग्ण ही एक चाचणी घरात करू शकतात. अर्थात त्यानंतर स्वॅब टेस्ट करावीच लागणार आहे. पण या चाचणीमुळे स्वॅब टेस्टआधी अलगीकरणात जाण्याचा निर्णय घेण्यास मदत होते.
कोरोनाची लागण झाल्यावरचं गंध न कळण्याचं लक्षणं आणि इतर सर्दी किंवा फ्लू झाल्यावरचं लक्षण यामध्ये फरक असल्याचं आढळून आलं आहे.
कोव्हिड-19 झाल्यानंतर रुग्णांना लगेचच हे लक्षण दिसायला सुरुवात होते. पण यामध्ये नाक गळणं किंवा नाक बंद होणं असे प्रकार दिसत नाहीत. कोरोनाची लागण झालेले अनेक रुग्ण मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात. शिवाय या रुग्णांच्या तोंडाची चव जाणं हेसुद्धा एक लक्षण कोरोना संसर्गाचं आहे.
0 Comments