Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...ते कोतवालीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व दोन पोलिस कर्मचा-याविरूद्ध महिलेची तक्रार
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर, दि.१२ - शारीरिक व मानसिक त्रास देत कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांनी दोघां पोलीस कर्मचा-यांच्या मदतीने अनेक वेळा पदाचा गैरवापर करून मला सरकारी बंगल्यावर नेऊन माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच अनेक वेळा मला मारहाण करीत मुलाला व आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेने दिला आहे. दरम्यान, याबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पो.नि.लोंखडे यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रार अर्ज आल्याचा दुजोरा दिला.
तक्रारदार महिलेने अर्जात म्हटले की,
 माझ्या घरी माझा ९ वर्षाचा लहान मुलगा व वयोवृद्ध आई असे एकत्र राहातो. सुमारे दोन वर्ष पूर्वही मी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता, पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्याशी माझी ओळख झाली. तेव्हा माझ्या तक्रारीचा बहाणा करून त्यांनी माझा फोन नंबर घेऊन फोन करण्यास सुरवात केली. मी त्यांना सतत टाळत होते. मी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात असल्यामुळे त्यांनी माझा घरचा पत्ता काढला. माझा फोन नंबर घेऊन फोन करण्यास सुरुवात केली. मी त्यांना सतत टाळत असे. मी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहण्यासाठी असल्याने त्यांनी माझ्या घराचा पत्ता शोधून काढला. माझ्या घरी कोणी कर्ता पुरुष नाही. ही माझी परिस्थिती ओळखून अचानक एक दिवशी माझ्या घरी आले. मी त्यांना चहापाणी केल्यानंतर ते मला म्हणाले की, मला तू खूप आवडतेस, तेव्हा मी त्यांना बोलले की सर तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, मी तुमचा खूप आदर करते. तेव्हा ते माझ्याजवळ येऊन माझ्या शरीराला स्पर्श करू लागले. मी त्यांना विरोध करत म्हणाले की, सर हे योग्य नाही. तुम्ही माझ्याशी चुकीचे वागत आहात, तेव्हा ते म्हणाले या सगळ्या गोष्टी चालतात जास्त विचार करू नको. माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे. त्यावेळी ते त्याच्या वर्दीत होते. त्यांनी कमरेची रिव्हालवर काढून त्याचा धाक दाखवून माझ्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने माझी इच्छेविरुद्ध माझ्यावर अत्याचार केला. मी त्यांना प्रतिकार करण्यास प्रयत्न केला असता, त्यांनी मला त्यांच्या कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. मला धमकी दिली तू जर हे कुणाला सांगितले, तर मी तुझे जगणे कठीण करेल. तुझ्या मुलाला आईला जिवंत ठेवणार नाही. यावेळी त्याच्यासोबत त्याचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे व कॉन्स्टेबल तन्वीर शेख हे होते. त्यावर अनेक वेळा हे तिघही माझ्या एकटेपणाचा फायदा घेत. त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला मारण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यातून गर्भधारणा झाली. तेव्हा मी ही बाब 26 सप्टेंबर 2019 मध्ये विकास वाघ यांना सांगितले असता, त्यांनी मला सोनोग्राफी करण्यासाठी आनंदऋषी हॉस्पिटल येथे पोलीस कॉन्स्टेबल तन्वीर शेख सोबत पाठविले. तेथे ही बाब रिपोर्टवरून खरी असल्याचे समजले. यानंतर त्यांनी त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. त्याच दिवशी रात्री पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे हे मला माझ्या घरी घेण्यासाठी आले. साहेबांनी तुम्हाला बोलावले असे सांगितले. मी त्यांच्यासोबत गेले असता मला ते विकास वाघ राहात असलेल्या सरकारी बंगल्यात घेऊन गेले. तेथे त्यांनी जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. परंतु मी त्या गोष्टीस प्रतिकार करते हे पाहू वाघ यांनी पोलीस कर्मचारी लहारे व तन्वीर शेख या दोघांच्या सहाय्याने कमरेचा पट्ट्याने व बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. मी शुद्धीवर आल्यानंतर तत्कालीन कोतवाली पो.नि. विकास वाघ हे म्हणाले, मी तुझ्याशी लवकरच लग्न करेल फक्त आता माझ्या ऐक व ह्या गोळ्या घे, असे म्हणून मला जबरदस्तीने गोळ्या खाऊ घातल्या. त्यातून माझे गर्भपात झाला. त्यानंतर सतत मला शारीरिक व मानसिक त्रास देत पो.नि. विकास वाघ यांनी या लहारे व तन्वीर शेेख याच्या  सहाय्याने अनेकवेळा पदाचा गैरवापर करून मला सरकारी बंगल्यावर घेऊन माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. अनेक वेळा मला मारहाण करून देखील माझ्या मुलाच्या जीविताला धोका असल्यामुळे मी हे सगळे सहन करत गेले. एप्रिल 2020 महिन्यात मला हे सर्व असह्य झाल्याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्याचे ठरवले असता, हे पो.नि विकास वाघ यांना समजल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय येथून प्रमोद लहारे व तन्वीर शेख यांनी मला जबरदस्तीने त्यांच्या गाडी घेऊन जाऊन एमआयडीसी येथील अनोळखी भागात नेले. तेथे पो.नि. विकास वाघ हे आले. यावेळी पोलिस कर्मचारी प्रमोद लहारे व तन्वीर शेख यांनी माझ्या हात धरून माझ्या शरिराशी झटापट करीत लज्जा उत्पन्न होईल, अशा अशील पद्धतीने वर्तन केले. यावेळी पो.नि. विकास वाघ यांनी बिअरची बाटली फोडून माझ्या गळ्याला जखम होईपर्यंत वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धमकावले की पुन्हा आमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केल्यास तुला तुझ्या मुलाला व आईला संपून टाकू, अशी धमकी दिल्याने खूप भयभीत झाले. त्यांची माफी मागितली, त्यावेळी त्यांनी अनेक कागदावरती माझ्या सह्या घेतल्या. त्यांनी पाहिजे तशी माझी  पो. नि वाघ यांनी पैसे मागणार्‍या रेकॉर्डिंग तयार करून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मला नोटरी ऑफिसमध्ये नेऊन माझा कुठलाही संबंध नसल्याची नोटरी तयार करून माझी त्यावर जबरदस्तीने सही घेतली. त्यानंतर मी पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार देण्यास गेली असता, त्यांनी मला व्हाट्सअप वर 'मी तुला खोट्या गुन्ह्यात कसा आडकवेल' असा मेसेज पाठवला. मी तुला खंडणी सारख्या मोठ्या गुन्ह्यात अडकविण अशा धमक्या दिल्या असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments