Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अराकेश्वर मंदिरात तीन सेवेक-यांचा खून

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / क्राईम 
 बंगळुरू : कर्नाटक राज्यातील मंड्या येथील एका मंदिरातील तीन सेवेक-यांचा गुरुवारी (दि.११) खून झाल्याची खळबळ घटना अराकेश्वर मंदिरात घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरूवारी पहाटे मंदिरामध्ये दरोडेखोरांनी प्रवेश केला.या दरम्यान, झोपलेल्या तीन सेवेक-यांचा खून केला. यानंतर त्यांनी मंदिरामधील दानपेट्या पळवून नेल्या. या घटनेची माहिती मिळताच, तातडीने वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी तपासासाठी तीन पथके तयार करून तपास सुरु केला.
कोरोनाचा कालावधी असल्याने मंदिरातील सेवेकरी हे मंदिरातच झोपत होते. या मंदिराचा कारभार हा सरकारकडे आहे. पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला होते. यावेळी तीनपेक्षा जास्त दरोडेखोर असावी. त्यांनी झोपलेल्या अवस्थेत सेवेक-यांवर धारदार शस्त्रांनी वार करून खून केला असल्याची माहीती पोलिसांनी दिली.
त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या तीन मोठ्या दानपेट्या पळवून नेल्या. मंदिराबाहेर त्या फोडून त्यातले पैसे लंपास केले अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. सकाळी जेव्हा स्थानिक लोकांना मंदिराची दारं उघडी दिसली तेव्हा त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. तीन सेवेकरी मयत अवस्थेत दिसले. मंदिराच्या गर्भगृहातही दरोडेखोरांनी तोडफोड केली होती. दानपेट्या पळविण्यासाठी त्यांनी तोडफोड केली असावी, असंही पोलिसांनी सांगितलं. मंदिरच्या सुरक्षेविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि विश्वास निर्माण करावा अशी मागणी होत आहे. शहरातल्या इतर मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही पोलीस आढावा घेत असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन शोधपथक स्थापन केली असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.Post a Comment

0 Comments