Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पाटोदा तालुकाध्यक्षपदी ह.भ.प. मेहबूब महाराज शेख यांची निवड

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सौताडा, दि.५- मराठवाडा प्रदेश अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री व उपाध्यक्ष हभप आदीनाथ महाराज दानवे यांनी सर्वानुमते श्री शेत्र रामेश्वर सौताडा येथील कीर्तनकार हभप मेहबूब महाराज शास्त्री यांची पाटोदा तालुका वरकरी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कुशल संघटक, चारित्र्य संपन्न व्यक्तित्व, प्रभावी वक्तृत्व, उत्तुंग कर्तृत्व ,वारकरी विचारांना समर्पित जीवन असणाऱ्या या सार्थ निवडीबद्दल श्रीक्षेत्र सौताडा व परिसरातून निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले.
वारकरी महामंडळ ही संघटना वारकऱ्यांचे संघटन व एकीची वज्रमूठ निर्माण व्हावी यासाठी संतवीर वै. रामदासबुवा मनसुख यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील सर्वात पहिली वारकरी संघटना आहे. महामंडळाची 1987 मान्यता शासनाद्वारे प्राप्त असणारे एकमेव संघटन .ज्या संघटनेच्या द्वारे पंढरपुरातील पांडुरंग मंदिर सर्वांसाठी खुले झाले, ज्या संघटनेद्वारे पवित्र सहलीला इंद्रायणी मातेच्या निर्मल पाण्यामध्ये डाऊ कंपनी यांसारख्या घातक कंपन्यांनी विषारी द्रव पदार्थ सोडले होते त्यासाठी व्यापक डाऊ हटाव आंदोलन करून इंद्रायणी शुद्ध ठेवण्याचे करण्याचे काम केले, याच वारकरी महामंडळाच्या वज्र मुठीने वसंत काळपांडे, आनंद यादव, यासारख्या विचारवंतांना संत विचारांचा अवमान प्रकरणी धडा शिकवला, अशी राज्यव्यापी व देशव्यापी असलेली ही वारकरी महामंडळ संघटना या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या तालूका अध्यक्षपदी हभप मेहबूब महाराज शेख यांची निवड ही यथार्थ आणि पद व व्यक्ती याला योग्य न्याय देणारी आहे. महाराजांच्या या निवडीबद्दल सर्व वारकरी मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments