Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोगस डाॅक्टराचा पर्दफाश : हैदराबाद रचकोंडा पोलिसांची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
हैदराबाद - आंध प्रदेशतील एका युवकाने खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे तब्बल १६ वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर म्हणून काम केले. परंतु , हैदराबाद रचकोंडा पोलिसांनी त्या मुन्नाभाई डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. त्या बोगस डाॅक्टरचे नाव तेजा रेड्डी असे आहे.
या महाशय बोगस डाॅक्टर याने या कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनामध्ये विशेषातः त्याने कित्येक रुग्णांवर उपचारही केले आहेत. कोरोनावरील औषधेही त्याने दिली आहेत. 
रंचकोंडा पोलिसांना आपल्या शाब्दीक जाळ्यात अडकवून तेजारेड्डी याने लॉकडाऊन काळातही खोट्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने डॉक्टर बनून काम केले. मात्र, रचकोंडा पोलिसांना या युवकांचा संशय आल्यानंतर त्यांनी तपास केला असता हा फेक डॉक्टर निघाला. पोलिसांनी या नकली डॉक्टरसह त्याच्या एका साथीदारालाही अटक केली आहे. विशेष म्हणजे नकली वैद्यकीय प्रमाणपत्र बनविणारी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. 
वायएस तेजा रेड्डीसह त्याचा साथीदार बोकुडी श्रीनिवास आणि तेजाचे वडिल वीरगंधन वेंकट यांना खोटे प्रमाणपत्र देण्यासाठी कामावर ठेवण्यात आले होते. पोलिसांनी अटक केलेल्या फेक डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीने मानसिक व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. माझी फसवणूक झाली असून लग्नाच्या खोट्या जाळ्यात मला अडकवल्याचे या पीडितेने सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी तपास सुरू केला असता या डॉक्टरचा भांडाफोड झाला. तसेच, नकली डॉक्टर असलेल्या तेजाविरुद्ध आणखी 4 ठिकाणी गुन्हा नोंद असल्याचेही तपासात उघड झाले. नोकरीचे आमिष आणि जागेच्या व्यवहारतही अनेकांची फसवणूक तेजाने केल्याचे तपासात उघड झाले.
विशेष म्हणजे तेजाच्या शिक्षणाची खरी ओळख पटल्यानंतर पोलिसांनाही धक्काच बसला. कारण, पाचवी नापास असलेला तेजा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे डॉक्टर बनला होता. तेजाचे दहावीचे प्रमाणपत्र, मायग्रेशन प्रमाणपत्र, यासंह इतर सर्वच प्रमाणपत्र बोगस होते. याप्रकरणी पोलिसांनी तेजासह त्यास बोगस प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या इतर 5 जणांनाही अटक केली आहे. लखनौ येथील भारतीय शिक्षा परिषद येथून तेजाने मार्कशीट आणि बोगस प्रमाणपत्र केवळ १ लाख रुपयांत बनवल्याचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी सांगितले. तसेच, छत्तीसगडच्या आयुष युनिव्हर्सिटीतून आपले सन 2010 ते 2014 या कालावधीतील MBBS चे शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही याने मिळवले होते.  

दिल्लीतही होता बोगस डॉक्टर
काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायसरच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुशंगाने दिल्ली पोलिसांनी खोटी प्रमाणपत्र बनवणारी टोळी पकडली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोरोनाचे खोटे प्रमाणपत्र बनवणाऱ्या एका डॉक्टरला आणि त्याच्या 2 साथीदारांना अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या या डॉक्टरचे नाव कुश पराशर असून त्याने रशियातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. 

Post a Comment

0 Comments