Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केडगाव मनपा कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक सुविधा द्या, अन्यथा आंदोलन ; नगर शहर शिवसेनेचा इशारा

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर,दि.२- केडगाव महापालिका कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याने कोविड बाधित रुग्णासह नगर-पुणे रस्तारोको करण्यास परवानगी मिळवी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे अहमदनगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, सुनिताताई कोतकर, शांताबाई शिंदे आदिंनी केली आहे.
केडगाव येथे महापालिकेने कोविड सेंटर सुरू केले. पण त्या ठिकाणी मनपा सुविधा देत नाही. कोविड सेंटरमध्ये एक तज्ञ डॉक्टर, फार्मासिस्ट आणि रोटेशन प्रमाणे ५ ते ६ सिस्टर व स्वच्छतेसाठी आवश्यक कर्मचारी पुरविणे असताना मनपाने कोणतीही उपाययोजना केली नाही. सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणे नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी आॅक्सिजन सुविधा नाही. वारंवार मनपा आयुक्तांकडे तक्रारी केल्या असताना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. कोविड सेंटरमधील रुग्ण व नातेवाईक हातबल झाले आहेत.
दोन दिवसांत तातडीने केडगाव कोविड सेंटरमध्ये महापालिकेने सुविधा पुरविल्या नाहीतर केडगावचे चारही नगरसेवक आणि नगर शहर शिवसेनेतर्फे कोविड रुग्णासह ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख सातपुते यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments