Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाकिस्तानातील महिला पत्रकाराची गोळ्या घालून हत्याऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नवी दिल्ली,दि.६- : पाकिस्तानात शनिवारी एका महिला पत्रकाराची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या सरकारी टीव्ही चॅनलच्या
महिला पञकाराचे शाहीना शाहीन असे नाव आहे.
शाहीना ही पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. काही दिवसांपूर्वीच तिची बलूचिस्तानमधील तुर्बत इथं बदली करण्यात आली होती. शाहीना ही पहिली नाही तर याआधीही गेल्या वर्षी उरुज इक्बाल नावाच्या एका महिला पत्रकाराला गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, 1992 पासून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 61 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच आठवड्यात एका मुलाखतीत पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील पत्रकारांना सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर अशी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबारानंतर आरोपी फरार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहनाची तिच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते. ते तिच्या घरी गेले आणि दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच आरोपींनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. शाहीनाला 5 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर काही अज्ञात व्यक्तींने शाहीनाला तातडीने कारमध्ये रुग्णालयात नेलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शाहीनाच्या कुटुंबीयांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये शाहीनाच्या नवऱ्याचंही नाव असल्याची माहिती समोर येत आहे. 5 महिन्यांपूर्वी शाहीनाचे लग्न झालं होतं. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments