Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घरामध्येच बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर ; अमेरिका, कॅनड देशातील नागरिकांना गंडा

     



ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई : कॉल सेंटरात नोकरीला असताना, स्वत:च्या घरातूनच बोगस आंतराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू केले. यात देशभरात २०० जणांची साखळी उभी करून पाच वर्षांत अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची कोट्यवधी डॉलर्सनाची फसवणूक केली.  निशांत नागराज शिरसिकर (वय ३०) असे त्याचे नाव असून, त्याला गुुन्हे गुप्तवार्ता विभागाने (सीआययु) अटक केली आहे.
निशांत शिरसिकर याच्याकडून ४० लाख रुपयांच्या रोख रक्कम व १० लाखांची सोन्याची बिस्किटे आणि अंमली पदार्थ जप्त केली आहेत.निशांत मूळचा कर्नाटकचा रहिवासी असलेला  मालाड परिसरात भाडेतत्त्वावर राहायचा. सीआययुचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना याबाबत माहिती मिळताच, पथकाने २९ आॅगस्ट रोजी निशांतला मालाड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पाच लाखाच्या रोख रकमेसह गांजाने भरलेली सिगारेट आणि चोरीची दुचाकी मिळून आली. त्यानुसार बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत, त्याला अटक करण्यात आली.  
चौकशीत तो घरातूनच गेल्या ५ वर्षांपासून बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्याने साथीदारांच्या मदतीने भारतातील विविध शहरांमधून मोबाइल फोनद्वारे अमेरिका, कॅनडामधील नागरिकांना लक्ष्य करत, कोट्यवधी डॉलर्सना गंडविले आहे. ही मंडळी महसूल सेवा, युएसए सिटिझनशिप किंवा इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवून सरकारकडे थकबाकी रक्कम न भरल्यास अटक, तुरुंगवास, दंड, हद्दपारीची भीती घालून पैसे उकळत होते. यात, डाटा ब्रोकर आणि अन्य  स्रोतांकड़ून मिळालेल्या माहितीच्या आधारे फसवणूक सुरू होती. त्याच्या कोठडीत ४ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली 
 भारतात निशांतने साखळी तयार केली होती. त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना तो कधी ऑनलाइन तर कधी भेटून ट्रेनिंग देत असे. त्यांना डाटा पुरविल्यानंतर त्याने तयार केलेली स्क्रिप्ट फक्त संबंधित कॉलधारकांशी बोलताना वाचून दाखविण्यास सांगत असे. पुढे सावज अडकताच हवाल्यामार्फत पैसे मिळत होते.

Post a Comment

0 Comments