Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या प्रसिद्धीसंदर्भात भारत निवडणूक आयोगाकडून सुधारित सूचना जारी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
  अहमदनगर दि.15: भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
    या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित दिशानिर्देशानुसार उमेदवारांनी तसेच त्यांना नामनिर्देशित केलेल्या राजकीय पक्षांनी संबंथित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर खालीलप्रमाणे प्रसिध्द करणे अपेक्षित असणार आहे.
    प्रथम प्रसिध्दी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये, दुसरी प्रसिध्दी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या 5 व्या ते 8 व्या दिवसांमध्ये, तिसरी प्रसिध्दी 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (म्हणजेच मतदान होण्याच्या 2 दिवस अगोदर).  हे वेळापत्रक मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकार चांगल्या माहितीच्या आधारे उपयोगात आणण्यास मदत करेल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणा-या राजकीय पक्षाच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की, बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणा-या राजकीय यांनी सुध्दा इतर उमेदवार व राजकीय पक्षांसाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील प्रसिध्द करतील.
      यासंदर्भातील सर्व सूचना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशित करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजेत. या सुधारित सूचना तात्काळ प्रभावाने लागू होतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 

Post a Comment

0 Comments