Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बडतर्फ पोलिस कर्मचारी एक वर्षानंतर अखेर अटक

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे : - पुणे ग्रामीण पोलिस दलातील बडतर्फ पो.ना. पोपट मुरलीधर गायकवाड (वय 30, सरपंच वस्ती, दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) हा खूनी हल्ला घडवून आणल्या प्रकरणी शिरुर पोलिसांना हवा होता. अखेरीस अंदाजे सुमारे एक वर्षानंतर तो शिरुर पोलिसांना शरण आला आहे. याबाबत शिरूर पोलिस ठाण्याचे पो. नि. प्रवीण खानापुरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सुमारे एक वर्षापूर्वी शिरुर तालुक्यातील करडे येथील ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान उपसरपंच अंकुश बांदल यांच्यावर चोरीच्या उद्देशाने खुनी हल्ला केल्यांच्या प्रकरणात चार आरोपी निष्पन्न झाले होते. त्यातील दोन आरोपी अटक केले असून एक फरार आहे.तर दुसरा आरोपी पोपट हा देखील पोलिसांना हवा होता.
या हल्ल्याचा कट रचल्या प्रकरणी पोपट गायकवाड वर शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचा बंडतर्फ पोलीस नाइक पोपट गायकवाड हा निष्पन्न झाल्याने त्यावेळी पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्याबाबत शिरूरचे पो.नि. प्रवीण खानापुरे यांनी मोठ्या शिताफीने तपास करून दोन आरोपींना अटक केली होती तर दोन आरोपी अद्यापही हवे होते. अखेरीस एक वर्षीच्या कालावधी नंतर बडतर्फ पोलिस कर्मचारी पोपट गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान आरोपी यास शिरूर न्यालयात हजर केली असता न्यालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पो.नि. खानापुरे यांनी सांगितले. पोपट गायकवाड वर यापूर्वी ही अहमदनगर जिल्हातील पारनेर येथे देखील तबाखू जन्य प्रदार्थाची लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. पोपट गायकवाड हा पोलिस दलातील कर्मचारी असल्याने त्याला पोलिस दलातील गुन्हयाचा तपास करण्याच्या पध्दती माहित असल्याने तो सतत पोलिसांना गुगांरा देत होता.आता त्याचा अजून कोणत्या गुन्हयात सहभाग आहे का किंवा कोणता गुन्हा केला आहे.याचा तपास शिरुरचे पो.नि. प्रविन खानापुरे करत आहेत.
Post a Comment

0 Comments