Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या लढ्यासाठी भाजपाची लवकरच कमिटी जाहीर करणार : महेंद्र गंधे

 


अहमदनगर शहर भाजपा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३- कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात माहिती व जनजागृती नसल्यामुळे त्यावरील उपयायोजना काय आहेत, याची माहिती होणे गरजेचे आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. यामध्ये जनतेला सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. पीएम केअरच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला ५0 व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी भाजपाच्यावतीने नगर शहरामध्ये उपाययोजना करण्यासाठी शहरातील नामवंत डॉक्टर तसेच आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टर यांना एकत्रित करुन काम करणार आहे. तसेच भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांची ११ जणांची कमिटी तयार करुन नागरिकांना कोरोना संदर्भात मदत करणार आहेत. कोरोनाच्या संकटामध्ये भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या सहा महिन्यापासून काम करत आहेत. आता वेगवेगळ्या भागामध्ये टीमवर्कच्या माध्यमातून काम करणार आहे, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे यांनी केले.
नगर शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत असल्यामुळे भाजपा शहर जिल्हा पक्षाच्यावतीने विविध उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे. समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक, ज्येष्ठ नेते सुनील रामदास, वसंत लोढा, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, संगिता खरमाळे, सुधीर पगारे, शिवाजी दहिहंडे, मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडलअध्यक्ष पंकज जहागिरदार, संतोष गांधी, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, अमोल निस्ताने, पी. डी. कुलकर्णी वंदना पंडित आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना काळात शहरामध्ये चांगले काम करत आहेत. कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, निस्वार्थपणे जनतेला सहकार्य करत आहेत. गेल्या सहा महिन्यामध्ये महानगरपालिकेला सरकारने कुठलीही आर्थिक मदत न करता पालिकेने नागरिकांच्या आरोग्य सुविधेबरोबरच चांगले अन्नछत्र सुरु करून अन्नदान केले. शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कोरोना सेंटरची उभारणी केली. पहिल्या दिवसापासून मनपाचे अधिकारी व कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. मोफत स्त्रवकेंद्र सुरु करुन नगरकरांना दिलासा देण्याचे काम केले. या पुढील काळातही भाजपच्या माध्यमातून नगरकरांना चांगल्या सुविधेबरोबर आरोग्यसेवा देण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सूचना जाणून घेतल्या व या बैठकीमध्ये कोरोनाच्या सर्व अर्टीचे पालन करुन बैठक पार पडली. तसे नगरकरांना कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा.
यावेळी ज्येष्ठ सुनील रामदासी, वसंत लोढा यांनी मार्गदर्शन के ले. कार्यक्रमाची प्रस्तावना संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक यांनी केले. आभार प्रदर्शन तुषार पोटे यांनी मानले. सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले.


नगर : नगर शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत असल्यामुळे भाजपा शहर जिल्हा पक्षाच्यावतीने विविध उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे. समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक, ज्येष्ठ नेते सुनील रामदास, वसंत लोढा, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, संगिता खरमाळे, सुधीर पगारे, शिवाजी दहिहंडे, मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडलअध्यक्ष पंकज जहागिरदार, संतोष गांधी, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, अमोल निस्ताने, पी. डी. कुलकर्णी वंदना पंडित आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments