Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नाकर्त्या बिघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही- भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ, दि.१४ :-  कायम मागासलेपणाचे जीवन जगत असलेल्या मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व नौकरीत आरक्षणाची नितांत गरज ओळखून भाजपा सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले होते परंतु न्यायालयाच्या चौकटीत सध्याच्या कर्मदरिद्री, नाकर्त्या बिघाडी सरकारच्या उदासिन भुमिकेमुळे टिकु शकले नाही यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष पसरला असुन समाजाच्या या न्याय मागणीसाठी मी मराठा समाजासोबत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी म्हटले आहे.


मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांनी सातत्याने पुढाकार घेत मराठा समाजाची बाजु लावुन धरली होती या आरक्षणप्रश्नी माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.राज्यात सत्तेवर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सरकारने मराठा समाजास शिक्षण व नौकर्यामध्ये सोळा टक्के आरक्षण देवु केले होते.सदरील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावनी सुरु होती.राज्य सरकारच्या वतिने मराठा समाजास आरक्षणाची काळाची गरज असल्याची बाजु मांडणे अपेक्षित होते परंतु तीन तोंडे असलेल्या या सरकारला ही बाजु मांडता आली नसल्याने सर्वोच्च न्यायालयात सध्या हे आरक्षण टिकले नाही यामुळे मराठा समाजातील एक पिढी बेरोजगार होण्याची भिती असुन राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना मराठा समाजाच्या परळी येथील आंदोलनास भेट देवुन सक्रिय पाठिंबा दिला होता.येणार्या काळात मराठा समाजाच्या या न्याय मागणीसाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो मराठा समाजाने घेतलेल्या भुमिकेसोबत असुन मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारु असा इशारा भाजयुमो बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments