Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व मिलिंद भारंबे यांची मुंबई सहआयुक्तपदी ; ४५ अधिका-यांच्या बदल्या

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई : पोलिस दलात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असतानाच बदल्यांचा आदेश निघाले आहेत. यात नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्तीपदी झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे तर, पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम व ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. एकंदरीत ४५ अधिका-यांच्या बदल्यांच्या आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

Post a Comment

0 Comments