Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणपती बाप्पांना प्रार्थना करोनाचे ही विसर्जन करा - सहजयोग परिवाराची सामूहिक प्रार्थना

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१ - प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणिता सहजयोग परिवाराच्या वतीने गणेशोत्सव निमित्त स्थापन केलेल्या गणेशाचे अनंत चतुर्थी निमित्त सहज भुवन, गोविंदपुरा, अहमदनगर येथे श्री गणेश विसर्जन आश्रम मध्येच करण्यात आले.
या वेळी सर्व सहजयोग्यांनी गणपती बाप्पाना सामूहिक प्रार्थना करून संपूर्ण जगातून कोरोना विषाणू चे विसर्जन कर, व संपूर्ण भारतामध्ये पर्जन्य वृष्टी संतुलित होऊ दे. अशी प्रार्थना केली.
या वेळी सहजयोग परिवाराच्या वतीने संपूर्ण जगात व भारत देशामध्ये सहजयोग कार्य बाबत माहिती दिली. नुकतेच दिल्ली येथील हॉस्पिटल मध्ये अनेक डॉक्टरांना तसेच कोविड रुग्णांना सामूहिक कुंडलिनी शक्ती ची जागृती दिली. त्याचा फायदा अनेक डॉक्टरांना व कोविड रुग्णांना झाली.
अश्याच पद्धतीने कोविड रुग्णांनी सहज ध्यान साधना पद्धत अवलंबिल्यास नक्कीच त्यांच्या आजरा मध्ये सुधारणा होईल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे सांगण्यात आले.
या वेळी सहजयोग परिवाराचे जिल्हा समन्वयक सुधीर सरोदे, कुंडलिक ढाकणे, गणेश भुजबळ, अंबादास येन्नम, मोहन रच्चा, राजू द्यावनपेल्ली श्रीनिवास बोज्जा व अहमदनगर येथील सहजयोगी यांनी एकत्रित येऊन संपूर्ण जगातून कोरोना विषाणू चे विसर्जन होण्याची सामूहिक प्रार्थना गणपती बाप्पांना करण्यात आली.

Post a Comment

0 Comments