Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महावीर चषक परिवारातर्फे बूथ हॉस्पिटलला 2 ऑपरेशन बेडची भेटअनिल दुगड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : करोनाकाळात जवळपास सहा महिन्यांपासून करोनाग्रस्त रूग्णांची आपुलकीने सेवा करणार्‍या बूथ हॉस्पिटलला नगरमधील महावीर चषक परिवाराने 2 ऑपरेशन बेडची भेट दिली आहे. महावीर चषक परिवाराचे सदस्य अनिल दुगड यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. करोना प्रतिबंधासाठी अथक प्रयत्न करणारे हात आणखी बळकट करण्यासाठी महावीर चषक परिवाराने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला आहे.
यावेळी अनिल दुगड, माजी नगरसेवक तथा अहमदनगर मर्चंटस्‌ बँकेचे संचालक संजय चोपडा, योगेश खताळ, राजेंद्र गांधी, बाळासाहेब गुगळे आदी उपस्थित होते. हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी देवदान कळकुंबे यांनी ही मदत स्विकारली. संजय चोपडा म्हणाले की, महावीर चषक परिवारातर्फे सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवातही विविध माध्यमातून सेवाभावी कार्यक्रम घेतले जातात. सध्याच्या करोनाच्या संकटात बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी देवदूताप्रमाणे रूग्णांची अविरत सेवा करीत आहेत. नगरकरांसाठी हॉस्पिटल वरदान ठरत आहेत. महावीर चषक परिवाराने याआधी हॉस्पिटलला स्प्रेअर मशिन भेट दिली होती. आता दुगड यांच्या वाढदिवसानिमित्त ऑपरेशन बेड देताना विशेष आनंद होत आहे. भविष्यातही हॉस्पिटलला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न राहिल.
देवदान कळकुंबे म्हणाले की, नगरला सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्ती, संस्था, मंडळांची मोठी परंपरा आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रूग्णाची आपुलकीने काळजी घेत आहोत. महावीर चषक परिवाराप्रमाणे अन्य व्यक्ती, संस्थांनीही वेळोवेळी मदत केल्यास आम्हाला आणखी चांगले काम करता येणे शक्य आहे. या उपक्रमासाठी आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड, डॉ.सचिन बोरा, लक्ष्मीकांत शेटिया, संतोष भळगट, अतुल शेटिया, बापूसाहेब गोरे, नफीस चुडीवाला, अमित पितळे, किरण पोखरणा, मयुर पितळे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments