Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर छावणी परिषद सदस्यांना आणखी सहा महिने मुदतवाढऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार दि.६- अहमदनगर छावणी परिषद सदस्यांना काही कारणांमुळे आणखी सहा महिने मुदतवाढ मिळाल्याने सर्वच्यासर्व सात सदस्य खुश झाले आहेत.त्यांना मिळालेली ही दूसरी मुदतवाढ आहे.
विद्यमान छावणी परिषद सदस्यांची पंचवार्षिक मुदत १०फेब्रुवारी २०२० रोजीच संपली होती.त्यानंतर काही कारणांमुळे छावणी परिषदेच्या संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ कार्यालयाने देशातील सर्व छावणी परिषद सदस्यांना सहा महिने मुदतवाढ दिली होती.ती मुदत या महिन्यात संपली आहे.
सध्याची कोरोनासंसर्ग परिस्थिती व छावणी परिषदेंची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता.त्यांची निवडणूकसाठी खर्च करण्याची परिस्थिती नसल्याने विद्यमान सदस्यांना आता पुन्हा नव्याने सहा महिने म्हणजे फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे पत्र बुधवारी अहमदनगर छावणी परिषदेत कार्यालयात प्राप्त झाले आहे.देशातील सर्व ५६ छावणीपरिषद सदस्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.
मुदतवाढ कालावधीत जर मध्येच छावणी परिषद पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली तर सदस्यांची मुदत या निवडणूकीच्या निकालाच्या दिवशीच संपुष्टात येईल असे पत्रकात म्हटले आहे.
सध्या शिवसेनेचा उपाध्यक्ष प्रकाश फुलारी,रवींद्र लालबोंद्रे व संजय छजलानी ,भाजपाच्या सौ.शुभांगी साठे व राष्ट्रवादीचे मुसदीक सय्यद,कलीम शेख व सौ.मीना मेहतानी छावणी परिषद सदस्य आहेत.मुदतवाढ मिळाल्याने सर्वांना पुन्हा जनसेवेची संधी मिळाली आहे.त्यामुळे सर्वच सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments