Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेला दारू पाजून बलात्कार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - संगमनेर बायपास नाशिक पुणे हायवेवर एक प्रवासी महिला चाकण येथे जाण्यासाठी वाहनांकडे मदत मागत होती. यावेळी तिला एका पिकअप चालकाने मदत दिली. मात्र या नराधमाने संबंधित महिलेस मारहाण करून तिला दारू पाजली व वाहनातच बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. 
ही घटना शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीसांना माहित झाली असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
या गुन्हयाचा तपास करत असताना अवघ्या बारा तासात पोलीसांनी या गुन्हयाचा छडा लावला असून आरोपी सुखदेव बबन कंकराळे (वय 39 रा. बारगाव पिंपरी ता.सिन्नर जि.नाशिक) यास बेडया ठोकल्या आहेत. 
आरोपीने गुन्हयात वापरलेली पिकअप देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून नारायणगाव येथे त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गुन्हयाबाबत माहिती विचारली असता प्रथमता टाळाटाळ केली. 
मात्र पोलिसांनी पोलीसीखाक्या दाखविला असता तो  बोलता झाला. हा गुन्हा मीच केला असल्याची त्याने कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments