Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भोयरे पठार आणि आरणगाव ग्रामपंचायतीस मिळणार एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून पिण्याचे पाणी ; खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

अहमदनगर दि.८- गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या भोयरे पठार आणि आरणगाव ग्रामपंचायतीस पिण्याच्या पाण्याची चणचण जाणवत आहे. विशेषतः अमदनगर शहरापासून केवळ पंधरा किलोमीटरच्या अंतरावर ग्रामपंचायत आहे.
या दोन्ही ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीतून पाईपलाईन टाकण्याचे व मोटर बसवण्याची सुद्धा तयारी होती मात्र खात्रीशीर पाणी पुरवठा नसल्याने अनेक वर्षापासून ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जशास तसा होता. टाकी बांधून , मोटर बसवण्याची तयारीसुद्धा ग्रामपंचायतीची होती मात्र पाणी उपलब्ध नसल्यामुळे गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा काही जात नव्हता. सुपा एमआयडीसीतील उद्योगांसाठी मुळा धरणातून लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत जात असताना भोयरे पठार ग्रामपंचायतीस मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. सात फेब्रुवारी 2020 रोजी एमआयडीसी करता जाणाऱ्या पाण्यातून ग्रामपंचायतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे साकडे ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर सुजय विखे यांना घातले. डॉक्टर विखे यांनी याची तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या मंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी थेट संपर्क करून महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सुपा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून भोयरे पठार ग्रामपंचायतीस पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यासंबंधीचा पाठपुरावा खासदार डॉक्टर विखे यांनी थेट अहमदनगर औद्योगिक महामंडळाचे कार्यकारी संचालक व अहमदनगर येथील मुख्य अभियंत्यांची संवाद करीत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या पत्राची दखल घेऊन व त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीच्या महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी तात्काळ भोयरे पठार आणि आणि आरणगाव साठी पाण्याची उपलब्धता करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दोन्ही ग्रामपंचायतींनी पाणी उपलब्ध झाल्यास जलशुद्धीकरण केंद्रापासून आपापल्या गावापर्यंत येण्याचे मान्य केले होते. यामुळे प्रलंबित असलेला ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. भोयरे पठार ग्रामपंचायतीस आता मिलिमीटर व्यासाची नळजोडणी मिळणार असून यातून 100 घनमीटर प्रतिदिन उपलब्ध होणार आहे, 945 घनमीटर प्रतिदिन इतके पाणी उपलब्ध होणार आहे.

Post a Comment

0 Comments