Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आठ शाळांवर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची प्रशासक म्हणून नियुक्ती ; खलावत चाललेला शैक्षणिक दर्जा , अनियमित सोई सुविधा , असूरक्षितता आदी गंभीर आरोप

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.१७- वैराग तालुका बार्शी येथील शैक्षणिक संस्था चालक बाळासाहेब कोरके यांच्या जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर आणि जय कालिका माता शिक्षण संस्था पानगाव या दोन संस्थेच्या आठ शाळांवर , खलावत चाललेला शैक्षणिक दर्जा , अनियमित सोई सुविधा ,  असूरक्षितता , आदी गंभीर आरोपामुळे सोलापूर येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
   त्यामध्ये तुकडोजी महाराज प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन आश्रम शाळा सर्जापूर , मातोश्री सुंदराबाई नरहरी कोरके कनिष्ठ महाविद्यालय सर्जापूर , प्राथमिक आश्रम शाळा जामगाव तालुका माढा , माध्यमिक आश्रम शाळा जामगाव तालुका माढा , प्राथमिक आश्रम शाळा वैराग , माध्यमिक आश्रम शाळा वैराग , उच्च माध्यमिक आश्रम शाळा वैराग , या शाळांचा  समावेश आहे.
      शैक्षणिक दर्जा अनियमितता सोयी-सुविधांचा अभाव सुरक्षितता संस्थेतील होत असलेल्या अनागोंदी कारभार याबाबत प्राप्त तक्रारी वरून सदर संस्थेची शिक्षण संचालक स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या आदेशानुसार २ मार्च रोजी समिती नेमण्यात आली होती या समितीने तीन दिवस तपासणी करून ५ मार्च रोजी अहवाल दिला यामध्ये आश्रम शाळा संहिता , शासन नियम , परिपत्रके , याबाबत संस्था आणि शाळेकडून त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे . ज्यात  सोयीसुविधा , प्रवेशीतांचे आरोग्य , सुरक्षितता , शैक्षणिक दर्जा ही नाही , कर्मचाऱ्यावर कसल्याच प्रकारचे नियंत्रण ही नाही . त्याबाबत मुख्याध्यापक आणि संस्थेस योग्य असा खुलासा ही करता आला नाही. मागासवर्गीय प्रेवेशीतांचे आरोग्य , सुरक्षितता व शाळेचे पोषक वातावरण याचा विचार करता , उपरोक्त काही समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या ८ शाळे वर प्रशासक नेमण्यात यावा.
   संचालक स्तरावरील समितीच्या चौकशी अहवालाची प्रत ही संस्थेस उपलब्ध करून दिली आहे परंतु संस्थेकडून अध्याप त्याचा खुलास देण्यात आलेला नाही . समितीचा अहवाल बघितल्यावर वरील दोन्ही आश्रम शाळेत गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून येत आहे त्यामुळे  संस्थेच्या या ८ शाळेचे कामकाज बघण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचारी यांचे थकित वेतन ज्या त्या कर्मचाऱ्यांच्या नावे न काढता ते मुख्याध्यापकाच्या नावाने काढून हडप केले जाते, विशेष म्हणजे संस्थापक बाळासाहेब कोरके यांच्या नावाने इमारतही नसताना सन  १९९७ पासून सन २०१४ पर्यंत शासनास खोटे भाडे पत्र दाखल करून स्वतःच्या नावे भाडे उचलून शासनाची  फसवणूक ही केलेली आहे संस्थाचालक आश्रम शाळेचा व्वहार चेकने न करता सर्व व्यवहार रोका रोकी करून स्वतःच रक्कम काढून घेतात   वॅट , जीएसटी , भरत नाहीत , खोट्या पावत्या जोडून संस्थेचे ऑडिट करून घेतले जाते . स्थानीक विद्यार्थ्यांना प्रवेश न देता ,
   लातूर नांदेड भागातील विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना प्रवेश दिला जातो अशा अनेक मुद्द्यावर या संस्थे  बाबत तक्रारी आहेत 
   बार्शी तालुक्यात अशाप्रकारच्या बऱ्याच संस्था आहेत या सर्वांची ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे . " आपल बी पितळ उघड पडतय की काय " ? या भितीने बार्शी तालुक्यातील या चौकटी मध्ये बसत असलेले संस्था चालक धास्तावलेले दिसत आहेत .


Post a Comment

0 Comments