ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२६ : शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे यावर्षी गौरी गणपतीचे आगमन नागरिकांनी साधेपणाने केले. पाईपलाईन रोड येथील कृष्णा कन्स्ट्रक्शनचे संचालक शिवाजी डोके यांनी सालाबादप्रमाणे गौरी गणपतीचे स्थापना अगदी साधेपणाने केले. दरवर्षी गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात, ढोलताशांच्या गजरात व १ हजार लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन, मूर्तीच आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने परिसर नटवत होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व नियमांचे पालन करुन यावर्षी गौरी गणपतीची स्थापना केली. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करुन या विषाणूपासून सर्वांना मुक्त करावे, अशी याचना केली. यावेळी शिवाजी डोके, दैवशाला डोके, नेहा डोके, ओम डोके, नानासाहेब डोके आदी उपस्थित होते.
0 Comments