Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही : देवेंद्र फडणवीस

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सातारा : अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एलबीटीवरुन भाजपवर निशाणा साधला, त्यानुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कराडच्या कृष्णा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.
दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकावरही निशाणा साधला.
“रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे. महाराष्ट्रात एलबीटी जरी असतं तरी आपल्याला पैसे मिळाले नसते. नुकसान झालं, तोटा झाल्याचे बोलून काहीतरी आकडे सांगायचे, असं न करता नीट अभ्यास करुन बोललं पाहिजे”, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
जीएसटीच्या थकबाकीवरुनही राज्य सरकारकडून भाजपवर टीका होत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य सरकावर घणाघात केला. “खोटं बोला ते पण रेटून बोला ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पद्धत आहे. मार्चपर्यंत जीएसटीचे पैसे राज्यांना मिळाले आहेत. ही मागणी मार्चनंतरची आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आ.रोहित पवार म्हणाले होते,
“राज्यात भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांनी एलबीटी घाईघाईने रद्द केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात 26 हजार कोटींचं नुकसान झालं. त्यासाठी त्यांनी एकदाही पाठपुरावा केला नाही. हा पैसा जर आपल्याला मिळाला असता तर आरोग्य आणि इतर गोष्टींसाठी तो खर्च करता आला असता. मात्र ते भाजप आहे. त्यांना राजकारणच सुचतं”, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.
“भाजप नेत्यांना खरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असता तर जीएसटीचे पैसे अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे अडकले आहेत. ते पैसे त्यांनी मागितले असते”, असा घणाघात रोहित पवार यांनी केला होता.
“आपल्या राज्यासाठी आणि लोकांसाठी राज्यातील भाजप नेत्यांनी एकदाही केंद्र सरकारकडे आवाज उठवला नाही. तसं कदाचित त्यांच्या धोरणात असेल किंवा भीतीपोटी केंद्राविषयी त्यांच्यातला कुठलाही नेता बोलू शकत नाही”, असा टोला आ.पवार यांनी लगावला होता.

Post a Comment

0 Comments