ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर,दि.२३- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिकेने तातडीने अमरधाम येथील विद्युत दहानी सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजीमहापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपजिल्हा प्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, परेश लोंखडे, संजय वल्लाकटी, विशाल वालकर, मनिष गुगळे, अमित लढ्ढा आदिंच्या निवेदनावर सह्या आहेत.
गेल्या तीन महिन्यापासून कोव्हाडीमुळे मोठ्या प्रमाणात मयताची संख्या वाढली आहे. अहमदनगरच्या अमरधामातील ओट्याची संख्या कमी आहे. तसेच विद्युत दहानीतील नादुरुस्त ओट्यांमुळे अंत्यविधीस दोन दोन दिवस विलंब होत आहे. यामुळे शहरवासीयांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी आहे. ही सर्व परिस्थिती पहाता, तातडीने विद्युत दहानी दुरूस्त करून सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments