Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बिबट्याचा लहान मुलावर हल्ला

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी:तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील भगत वस्ती परिसरात उमेश भगत या सहा वर्षाच्या लहान मुलावर आज (ता 22) शनिवार रोजी सायंकाळी  6.30 वाजेच्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.
उमेश आजी बरोबर जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व त्याला उचलून शेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात नेले त्याच वेळी आजी व घरातील व शेजारील माणसांनी बिबट्या मागे धाव घेतल्यानंतर बिबट्याने उमेशला उसात सोडून पळ काढला.
 घटनेत उमेशने शौर्य,आत्मविश्वासाने बिबट्याचा प्रतिकार केला.बिबट्याचा प्रतिकार करत असताना उमेश जखमी झाला असून त्याला अहमदनगर येथे  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वनविभाग कर्मचाऱ्यांनी यावेळी शेत शिवारात बिबट्याचा वावर असणाऱ्या परीसरात विशेष लक्ष देवून बिबट्याला जेरबंद करावे.अशी मागणी परीसरातील ग्रामस्थाकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments