ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी,दि.५- पुणे येथून मोटरसायकली चोरून आणून त्या बार्शी तालुक्यातील मुगंशी येथे विकताना एका ईसमास ९ मोटर सायकलीसह वैराग पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
याबाबत वैराग पोलीस कडून मिळालेली माहिती अशी उमेश विठ्ठल पवार राहणार मुंगशी तालुका बार्शी हा पुण्यात एका गॅरेजवर काम करीत होता लोँँकडाऊन मुळे काम बंद असल्याने तो गावाकडे आला आहे. येताना त्यांनी २ पल्सर ६ स्प्लेंडर १ एचएफ डीलक्स अशा ९ मोटरसायकली चोरून घेऊन आला आहे त्या गाड्या येथील उमेश पवार याच्यामार्फत विकणार असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली होती उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर मोरे व पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र राठोड , पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेबाडे , पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे ,आकाश कांबळे ,स्वप्निल शेरखाने ,ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने कारवाई करून 9 मोटरसायकलसह उमेश पवार याला ताब्यात घेतले आहे सदर आरोपीविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
0 Comments