Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वृक्ष हेच आपले मित्र : मेटे महाराज


वृक्षप्रेमी मित्र परिवाराचा झाडांसोबत 
रक्षाबंधन व बीजारोपण
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर  - वृक्षवल्ली आम्हां सोईरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार वृक्ष हे आपले मित्र असून वृक्ष संवर्धन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे मत संत शेख महंमद महाराज साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले.
वृक्षाबंधना मिमित्त वृक्षप्रेमी मित्र परिवाराच्या वतीने संत शेख महंमद महाराज समाधी परिसरात वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, दादासाहेब घोडके, उपसरपंच सतिषराव आटोळे, किसन आटोळे, चेअरमन रुपचंद झांजे, अक्षय सायंबर, नवनाथ झांजे, अजिनाथ मेटे, नवनाथ गाडे आदी उपस्थित होते.
मेटे महाराज म्हणाले की, मागील दशकात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याने निसर्गाने कृपादृष्टी केली होती मात्र सरकारनेच कायदेशीर दृष्ट्या वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवडीची चळवळ राबवल्यामुळे मोठ्या प्रमाात फायदा झाला परिणामी यावर्षी भरपुर पाऊस पडला. पुढी पिढीला शुध्द हवा, स्वच्छ पाणी व निसर्गाचा आनंद देण्यासाठी आज बिजारोपण करणे गरजेचे आहे. बिजारोपण, वृक्षरोपणाने निसर्ग निश्चितच प्रसन्न होऊन बळीराजाला आशिर्वाद देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी दादासाहेब घोडके म्हणाले, रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव. प्रत्येक भाऊ हा त्या धाग्याचे मोल मनामध्ये धरून आपल्या बहिणीच्या नात्याला आयुष्यभर जोपासतो व तीच रक्षण करतो. तसेच आज प्रत्येक स्त्री-पुरुषांनी निसर्गाच रक्षण करणं, त्याला जोपासणं याची आजच्या रक्षाबंधन दिनी शपथ घ्यायला हवी.  आम्ही मित्र परिवाराच्या माध्यमातून परिसरात एक लक्ष बिजारोपण केले असून 10 लक्ष बिजारोपणाचा संकल्प आहे. यामध्ये वेगवेगळी फळं, फुलं, छोटी मोठी झांडांचा समावेश आहे. डोंगराळ परिसर, गायरान, मंदिर परिसर आदी ठिकाणी दररोज दोन तास वृक्षप्रेमी मित्र परिवार वेगवेगळ्या ठिकाणी बिजारोपण करत आहे. प्रास्ताविक किसन आटोळे यांनी तर आभार नवनाथ गाडे यांनी मानले.  


Post a Comment

0 Comments