Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डाकजीवन विम्याचे पुनरुज्जीवन नोव्हेंबर २०२० पर्यत करता येणार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २५ - डाक जीवन विमा ही सर्वात कायदेशीर अशी विमा योजना भारत सरकारने १९८४ पासून सुरु केली. सध्या अहमदनगर डाक विभागामध्ये "डाक जीवन विमा अंतर्गत असलेल्या एकूण १३९२७५ पॉलिसी खंडित असून त्या पुनरूज्जीवीत करण्याची शेवटची संधी आारतीय डाक विभागाने विमाधारकाना दिली आहे. टपाल जीवन विमा योजना आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजने अंतर्गत खंडित झालेल्या पॉलिसी 3० नोव्हेंबर, २०२० पर्यंत पुनरुज्जीवीत करता येतील. अशी नाहिती अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांनी दिली आहे.
ज्या पॉलिसी खंडित झालेल्या असतील तसेच ज्या पॉलिसी सुरु केल्यापासून सतत ५ वर्षे भरणा न
केल्याने खंडित पडल्या असतील तर त्यांना पुनरुज्जीवीत करुन, सर्वसामान्य विमाधारकाना विमा लाभ मिळू शकतो. पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमाधारकांचे स्वास्थ्य चांगले असल्याचे वैदकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. तरी सर्व खंडित विमा पॉलिसी पुनरुज्जीवीत करुन घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.                                              

Post a Comment

0 Comments