ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.२३- शहरातील एम्. एम्. नि-हाळी विद्यालयात वृक्षारोपण करून गणपतीची शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत शिक्षकांनी 'गणपती बाप्पा मोरया' जयघोष करत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील गणपती बसविण्याची संकल्पना व नियाेजन प्राचार्य दिलीप गोरे यांनी केले. या सुंदर नियोजनाची दखल घेऊन एकलव्य शिक्षण संस्था, पाथर्डीचे अॅड. प्रताप ढाकणे व जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे यांनी अभिनंदन केले.
यावेळी एकलव्य शिक्षण संस्था पाथर्डीचे समन्वयक सुखदेव तुपे, उपमुख्याध्यापक साईकिशोर पडोळे, पर्यवेक्षक कैलास नरोडे, सरोदे सर, बाबासाहेब कुलधरण, नंदकुमार दसपुते, संजय उरशिळे, विष्णु बुगे, सनी मर्दाने, रवि गिते, शिवाजी शिरसाठ, सागर क्षिरसागर, श्री. लोव्हाडे आदि उपस्थित होते.
0 Comments