Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच अशोक अलाटचा मृत्यू ; कर्मचाऱ्यांचा आरोप

 आंबेडकर समाज बांधव व कर्मचारी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन , मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

बार्शी, दि२५-  बार्शी नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच सफाई कामगार अशोक बबन अलाट चा मृत्यू झाला. नगरपालिकेकडून सफाई कामगारांना हॅन्ड ग्लोज , गम बूट , मास्क , सॅनिटायझर , आधी आवश्यक वस्तू आवश्यकतेनुसार पुरवल्या जात नाहीत त्यामुळे कामगारावर असे प्रसंग ओढवतात त्यांचे  मेडिक्लेम ही नाहीत. उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते आर्थिक अडचण असल्यामुळे अलाट ला उस्मानाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला  
    अशोक अलाट यांच्या कुटुंबातील वारसांना १५ दिवसाच्या आत सेवेत सामावून घ्यावे व नगर परिषदेतील सर्व कर्मचार्यांचा आरोग्य विमा काढण्यात यावा हाँस्पीटल खर्चा साठी विनापैसे सुविधा देण्यात यावी  कर्मचार्यांना कायमस्वरूपी घरे देण्यात यावी अशोक च्या मृत्यूस जबाबदार दोषी अधिकार्यावर त्वरीत  कार्यवाही करण्यात यावी आदी मागणी चे निवेदन या ठिय्या अंंदोलनात देण्यात आले .
  बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी  अमीता दगडे पाटील  यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर  म्हणाल्या की सफाई कामगार अशोक अलाट याच्या मृत्यूस जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्यास तात्काळ निलंबित करण्यात येईल पुढील काळात कुठल्याही प्रकारची अडचण येवू देणार नाही अलाट यांच्या वारसांना तात्काळ सेवेत सामावून घेवू .
 नगराध्यक्ष असिफभई तांबोळी यांनी सफाई कामगांंराना कायम स्वरुपाची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी रमाई अवास  योजना किंवा पंतप्रधान अवास योजनेतून लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले व ठिया आंदोलन थांबवण्याची विनंती केली 
  या आंदोलनावेळी मागासवर्गीय कामगार संघटनेचे अजीत कांबळे , अँड अविनाश गायकवाड , आनंद कांबळे , नितीन शेंडगे , संदीप अलाट , प्रसन्न नाईकनवरे युवक काँग्रेसचे निखिल मस्के , मक्रोज बोकेफोडे सत्ताधारी गटाचे नगरसेवक विजय चव्हाण , कयुम पटेल  आदी ऊपस्थित होते , तर  बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी या अदोलनास पाठींबा दिला .

Post a Comment

0 Comments