Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना उर्वरित शेतकऱ्यांनी १० ऑगस्टपर्यंत आधार प्रमाणिकरण करून घ्या ; सहकार विभागाचे आवाहन


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि,५ :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 3 हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असुन त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन दि, १० ऑगस्ट,२०२० पर्यंत करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत शेतक-यांची रक्कम रु. २ लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेमध्ये अहमदनगर जिल्हयातील २ लाख ८९ हजार ५७० शेतकरी पात्र ठरले असून त्यापैकी २ लाख ८५ हजार ९६८ शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आलेली असून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलेला आहे. तथापि अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. अहमदनगर यांचे बँकेचे १५५३ खात्यांचे तर इतर बँकेचे २०४९ खात्यांचे अशा एकूण ३६०२ खात्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे या शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आलेला नाही.
तरी, या उर्वरित शेतक-यांनी विहित वेळेत आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा. आधार प्रमाणीकरण करतेवेळी ज्या शेतक-यांची तक्रार तालुका स्तरीय समितीकडे असेल त्या शेतक-यांनी आपले आधार प्रमाणीकरण तक्रार पावती घेऊन संबंधित तालुका तहसिल कार्यालय किंवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेशी दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत आवश्यक ते कागदपत्रे घेऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करुन घ्यावे. असे श्री.आहेर यांनी कळवले आहे.  

Post a Comment

0 Comments