Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर ते सोलापूर महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात : खा.डॉ.सुजय विखे पा.

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२८ - अहमदनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ च्या चौपदरीकरणाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात भूसंपादन अधिकारी यांनी वर्ग केला असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
नगर जिल्ह्य़ाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ च्या कामाकरीता श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली.प्रांताधिकार्यानी मंजूर केलेल्या निवाड्याप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.या प्रस्तावांना मंजूरी देवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने भूसंपादनापोटी ५० कोटी रूपयांचा पहीला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी मंजूर झाला असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.
या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बनप्रिंप्री तरडगाव मांडवगण व घोगरगाव या गावातील जमीनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी.बी.दिवाण यांनी सांगितले.
जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने बैठका घेवून पाठपुरावा केला. यापूर्वी कर्जत तालुक्यातील भूसंपादनासाठी ५० कोटी रुपयांचा पहीला हप्ता म्हणून वर्ग करण्यात आला होता.आता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहीला हप्ता म्हणून ५० कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments