Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

... म्हणून १२ ऑगस्ट पासून बाजार समितीचा व्यवहार बेमुदत बंद

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

बार्शी दि.१२ - बार्शी तालुक्यातील होत असलेल्या  काळाबाजारा संदर्भात बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांना पोलिसाकडून नाहक त्रास देण्याचे काम सुरू केल्याने याचा निषेध म्हणून बुधवार दिनांक १२ ऑगस्ट पासून कृषी उत्पन्न बाजार समिती मधील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय  बार्शी मर्चंट असोसिएशन लिमिटेड बार्शी चे सचिव भरतेश नवीनचंद गांधी यांनी याबाबत जिल्हाअधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले आहे .
  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , बार्शी येथील झालेल्या रेशनिंगच्या काळ्याबाजारा प्रकरणात बार्शी पोलिसाकडून सर्वच अडत्यांना त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे गुन्हे दाखल करणे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाने तिथे तासन तास बसून ठेवणे विनाकारण मानसिक त्रास देणे अधि कृत्य करीत असल्यामुळे  त्याचा निषेध म्हणून आणि इतर अनुसंगीक मागणीसंदर्भात  आम्ही बार्शी  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील  संपूर्ण व्यवहार  दिनांक १२ ऑगस्ट पासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .
    आम्ही सर्व व्यापारी अडत दुकानदार असून शेतकऱ्याकडून येणारा भुसार माल खरेदी करतो काही ठिकाणी बार्शी तालुक्यात रेशनिंगच्या गहू तांदूळ पोलिसांनी जप्त केला आहे असे समजले आहे.
परंतु आमच्याकडे येणारा गहू तांदूळ हा शेतकऱ्याचा आहे किंवा शासकीय आहे याची आम्ही खात्री करू शकत नाही किंवा आम्हाला समजायचे काहीच कारण नाही वाहन वाले शेतकऱ्यांचा माल वाहतूक करून आमच्या अडतीला घेऊन येतात अडती मध्ये त्या मालाचे सौदे होतात त्यामध्ये व्यापारी माल खरेदी करतात तेव्हा  तोमाल सरकारी आहे हे आम्ही कशावरून समजायचे आणि त्याची चौकशी तरी आम्ही कशामुळे करायच अर्थ आर्थी त्याच्याशी आमच्या काही संबंधही येत नाही तेव्हा आमची माननीय जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती करण्यात येते की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणार येणारा माला हा शासनाच्या यंत्रणेने तपासावा त्याकरिता शासकीय अधिकारी पुरवठा निरीक्षक यांची नेमणूक करावी कोणता माल खरेदी करावा किंवा कोणता माल विक्री करावा त्याची जिल्हाधिकारी यांनी त्यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी त्याची परवानगी आम्हाला द्यावी त्यास आमची काही तक्रार नाही परंतु विनाकारण कोणतीही खात्री न करता आमच्याकडील माल शासकीय आहे किंवा शेतकऱ्याचा आहे याची समक्ष संबंधित अधिकारी मार्फत खात्री न करता आम्हाला पोलिसांकडून होत असलेला त्रास थांबवावा याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवणार आहोत असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे त्या निवेदनाच्या प्रती पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
     रेशनिंग मालाचा रिकामा बारदाना कुठेही बारदाना विक्रेत्याकडे मिळतो त्यात आम्ही माल भरून ठेवला म्हणजे तोमाल शासनाचाच आहे असं नाही कोणीही पोलीस खात्यातील कर्मचारी येऊन तो शिक्का असलेली पोती बघून हा माल रेशनिंग चाच आहे असे म्हणून त्याचा गैरफायदा घेत आहेत म्हणून हा निर्णय आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून घेतला आहे असे प्रतिपादन बार्शी येथील अडते व्यापारी यांनी नगर रिपोर्टर शी बोलताना केले.

Post a Comment

0 Comments