Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा, तलवार विक्रीसाठी आलेला जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी,दि.२४- गावठी कट्टा व तलवार विक्रीसाठी आलेल्यास पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. आकाश अण्णा फुलारी (वय २२, रा.कासार पिंपळगाव,ता.पाथर्डी) पकडलेल्याचे नाव आहे.
गोपनीय मिळलेल्या माहितीनुसार वद्धेश्वर साखर कारखाना येथे सापळा लावून आकाश अण्णा फुलारी याला पकडले. यावेळी त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत कडतुस, २ तलवारी, रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण ४१ हजार २०० रू. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिशिरकुमार देशमुख, पोहेकाॅ मनोहर गोसावी, पोना राम माळी, सचिन आडबल, पोकाॅ राहुल सोळुंके, पोना रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, ज्ञानेश्र्वर, पोकाॅ रणजित जाधव आदिंच्या पथकाने कारवाई केली.

Post a Comment

0 Comments