Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

के रेंजबाबत दिल्लीत झालेल्या चर्चेचा तपशील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार - खा. डॉ. सुजय विखे पा.

ऑनलाईन न्यूज नेटवर्क / नगर रिपोर्टर 

अहमदनगर दि.१४- केके रेंज बाबत गोंधळाचे वातावरण असून राहुरी व पारनेर येथे लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षण मुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. के के रेंज साठी भूसंपादन झाल्यानंतर लष्कराच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त जमिनीला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. चाळीस वर्षापासून रेड झोनअसताना अतिरिक्त जमीन संपादन लष्कर करणार का? अतिरिक्त जमिनीची लष्करास आवश्यकता आहे का? व यापूर्वी जाहीर झालेल्या रेडझोन बाबत काय भूमिका आहे याबाबत आपण संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांची विस्तृत चर्चा केली. माननीय संरक्षण मंत्री यांनी आपल्या सोबत असलेल्या शिष्टमंडळास याकामी भरपूर वेळ दिला. तांत्रिक गोष्टींबाबत भारतीय सैन्याचे लष्कर प्रमुख मेजर जनरल नरवणे साहेब यांना भेटून सुद्धा त्यांना याबाबत अवगत केले आहे. जोपर्यंत राज्य सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत लष्करी कवायती व सर्वेक्षण थांबवावे अशी विनंती सुद्धा केली असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी . या चर्चेचा तपशील तसेच के के रेंज बाबत व लष्कर प्रमुख यांच्याशी झालेल्या तपशील चर्चेचा तपशील प्रकल्पबाधितांचे पर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत कुठल्याही समाज माध्यमातून येणाऱ्या चर्चेवर विश्वास न ठेवता ,कुठल्याही प्रकारच्या अफवेला बळी पडू नये असे आव्हान सुद्धा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले .
दिल्लीहून परतल्यानंतर आपण व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे दोघेही बाधित तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून के के रेंज बाबतची खरी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे असे डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments