Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धुळे येथील लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२७ : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता जमा करण्यात आलेली परीक्षा शुल्क विद्यापीठाने परत करावी व कोरोनामुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या २0२0-२१ या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे. धुळे येथे याच मागणीसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर अत्यंत अमानूष पद्धतीने मारहाण करण्यात आली. या गोरगरीब विद्यार्थ्यावरील मारहाणीचा निषेध करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने तहसीलदार कार्यालय येथे निदर्शन करून तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, मल्हार गंधे, आशिष आनेचा, अभिषेक शिंदे, स्वप्नील दगडे, यश शर्मा, साहील शेख, अमोल निस्ताने आदी उपस्थित होते. 

यावेळी केलेल्या मागण्या तिघाडी सरकारने लवकरात लवकर मान्य करावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील.
यावेळी पुढील मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या - कोरोना वैश्‍विक महारामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची परिस्थिती हालाकीची झाली आहे. याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २0२0-२१ चे ३0 टक्के शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हप्त्यामध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे. अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत, त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले. परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते, अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन करून
निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परीक्षेबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे. उपरोक्त मागण्यांसाठी दि. २६ ऑगस्ट २0२० रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली. परंतु अंसवेदनशील पालकमंत्र्यांनी भेट नाकारली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना समोर स्वतःच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत लाजिरवाना आहे, अशा मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. वरील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे, चुकीच्या निकालांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे. याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा. 
वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्रभर आंदोलन करेल, याची दखल घेण्यात यावी. 

Post a Comment

0 Comments