ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सांगली : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) पथकाने म्यान्मामधून तस्करीमार्गे भारतात आणलेले ४३ कोटींचे किमतीचे ८३.६ किलो सोने जप्त केले. याप्रकरणी नवी दिल्ली स्टेशनवर सांगली जिल्ह्यातील ८ जणांना अटक केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दिब्रूगढ-नवीदिल्ली राजधानी एक्स्प्रेसने शुक्रवारी नवीदिल्ली स्टेशन पोहोचलेल्या ८ जणांना थांबवून तपासणी केल्यावर त्यांच्याकडे सोन्याच्या ५४० विटा मिळून आल्या. हे सोने त्यांनी खास शिवून घेतलेल्या कपड्यात दडविले होते. बनावट आधार कार्डाने हे प्रवास करीत होते. या सोन्याच्या विटांवर विदेशी चिन्हे होती. मणिपूरमधील मोहे येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरून मान्मामधून तस्करीने हे सोने भारतात आणण्यात आले. टोळी हे सोने दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात विकणार होती.
आमिषे दाखवून भरती तातडीने पैसा कमावण्याचे आमिष दाखवून ही टोळी देशातील विविध भागांतील गरजू आणि गरीब लोकांना तस्करीसाठी भरती करायची. सोन्याची तस्करी करण्यासाठी हवाई, रस्ते आणि रेर्ल्वमार्गांचा वापर केला जात असे.
दिब्रूगढ-नवीदिल्ली राजधानी एक्स्प्रेसने शुक्रवारी नवीदिल्ली स्टेशन आल्यावर ८ जणांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे सोन्याच्या ५४० विटा मिळून आल्या.
0 Comments