Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कार्तिक घोगरे याचे 'पोलीस दादा' काव्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पा. यांनी केले अभिनंदन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१ :- कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. पोलीस दलात देखील कोरोना बाधित आढळत आहेत.तरीही पोलीस खंबीरपणे सेवा करत आहेत.
त्याबद्दल कोपरगाव शहरातील अन्नपूर्णानगर येथील कार्तिक प्रसाद घोगरे या मुलाने आपले लाडके पोलीस दादा या काव्यातून शब्दबद्ध केले.
त्याबद्दल त्याचे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका पत्राद्वारे विशेष अभिनंदन करून, भविष्यात त्याला आयपीएस अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ दिले आहे.
कार्तिक प्रसाद घोगरे सध्या औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. कोरोना महामारीत त्याने पोलिसांचे काम अतिशय जवळून पाहिले आहे. त्यांच्या विषयीच्या भावना त्याने आपले लाडके पोलिसदादा अशी कविता रचून व्यक्त केल्या.
त्यांने ही कविता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पाठवली व पत्रात त्याने आपल्यालाही आयपीएस अधिकारी होऊन देशसेवा करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यावर त्यांनी खास पत्राद्वारे हार्दिक अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments