Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवाजीनगर येथे कोव्हीड रुग्णालय नागरिकांच्या सेवेत समर्पित

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे, दि.23- शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात (सीओइपी) उभारण्यात आलेले कोव्हीड रुग्णालय नागरिकांच्या सेवेत समर्पित होत आहे.
पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे. पुण्‍यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर हे 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे.
यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे,
विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम,
पीएम आरडीएचे सुहास दिवसे उपस्थित.

Post a Comment

0 Comments