Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड बार्शीतील सातजण अटक

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी,दि१- बार्शी तालुक्यातील खांडवी लगत असलेल्या गोडसेवाडी कडून कव्हे कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमधील जुगार अड्ड्यावर शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी बार्शी पोलिसांनी छापा टाकून सात जणांना जुगार खेळताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा दुचाकी व जुगार साहित्य , २३ हजार१०० रुपये रोख असे एकूण एक लाख८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर प्रकरणी मुकेश अंबऋषी भोरे (रा. कसबा पेठ बार्शी), अमोल सुंदरराव देशमुख ( रा. ४२२ बार्शी), अतुल दशरथ बागल ,( रा. एकविराआई रोड बार्शी ), महेश चंद्रकांत पवार (रा. एकविरा गल्ली बार्शी), मनोज माळी ( रा. ४२२ बार्शी, खाजा भाई शेख रा. ४२२ बार्शी, प्रशांत शिवाजी जाधव रा. बार्शी) या सात जनावर तालुका पोलीस ठाणे बार्शी येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पांडुरंग सगरे महेश डोंगरे आदींनी कारवाई केली.

Post a Comment

0 Comments